Monday 21 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग आठ

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक आठ 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक आठ 

महिन्याच्या  ८,१७,२६ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ८ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह शनी असून जन्मत:च शांतता व एकांत प्रियतेची आवड असते.
२) कड़क शिस्तिचे भोक्ते, निश्चयी,स्थिर, कर्तव्य तत्पर असतात.
३) तुमच्यात काही प्रमाणात निराशावाद असतो.
४) जीवनात सर्व सूखे अतिशय विलंबाने त्यातला सगला रस संपल्यावर प्राप्त होतात.
५) स्वभाव संशयखोर व चिवट असतो.
६) तुम्ही समाजात जरी वावरत असलात तरी मनात एकटे पणाची भावना कायम घर करून असते.
७) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत अडचणी व विलम्ब याचा तुम्हास जीवनात पुरेपुर अनुभव येतो.
८) गरीब व दुबल्या लोकां बद्दल तुमच्या मनात कायम आपुलकी असते.
९) काम तुम्ही करता व श्रेय मात्र दूसरा घेउन जातो असे तुमच्याच बाबतीत घडते, व त्यातून नैराश्य येते.
१०) प्रेम प्रकरणा मधे समस्या निर्माण होतात.
११) गूढ़ विद्यांची आवड असून जादूटोना या विषयी आकर्षण असते.
१२) जन्मत:च उत्तम व्यवस्थापक असून इतरांकडून काम करून घेणे तुम्हास चांगले जमते.
१३) हवी असलेली गोष्ट मीलवन्यासाठी हवे तेवढे कष्ट घेण्याची तयारी असते.
१४) तुम्ही महत्वाकांक्षी असून दिर्घोद्योगी आहात.
१५) समाजात राहण्या पेक्षा समाजा पासून दूर रहाणे तुम्हाला पसंद असते.
१६) वयाच्या ३०, ३६ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो.
१७) जीवनात नैराश्याच्या आहारी ना जाता मित्रां मधे मिसलने तुमच्या फायद्याचे ठरेल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) अधिकार                                                   १) खिन्नपना / नैराश्य  
२) पद्धतशीरपना                                             २) आत्मविश्वासाचा आभाव  
३) व्यावहारिकपना                                         ३) खुनशीपना 
४) सहनशीलता                                              ४) मनोदौर्बल्य  
५) स्थिरवृत्ति व चिकाटी                                  ५) घातकीपना


शुभ वार = बुधवार,गुरुवार,शनिवार.
शुभ रंग = गडद करडा, गडद नीला,जाम्भला,काला.
मित्र अंक = ३,४,५,७,८ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment