Sunday 20 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग सहा

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक सहा 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक सहा 

महिन्याच्या  ६,१५,२४ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ६ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह शुक्र असून तुम्ही जन्मत:च  कला प्रिय आहात.
२) प्रेम, सहानभूति, आदर यांचे प्रतिक आहात.
३) जीवनात सौंदर्य व कले बद्दल ओढा असतो.
४) बोलण्यात आकर्षण व मोहक पाना असल्याने अनेक लोक तुमच्याकडे ओढले जातात.
५) विवाह श्रीमंत व्यक्ति बरोबर होतो व विवाह नंतर भाग्योदय होतो.
६) सामाजिक रूढी व बंधनाना तुम्ही बर्याचदा जुमानत नाही.
७) जीवन आरामदायक, ईश्वर्य युक्त व आनंदात जावे याकडे कल असतो व तसे प्रयत्न करता.
८) जीवनात पैसे वाचवन्या पेक्षा खर्च करण्याकडे तुमचा जास्त कल असतो.
९) उच्च प्रतीचे कपडे,सुगंधी द्रव्ये,दाग दागिने या बद्दल तुम्हाला प्रचंड आकर्षण असते.
१०) अनाठायी कालजी करण्याचा स्वभाव असून कही वेळा मनाने कष्टी होता.
११) उच्च पदस्थ लोकांकडून मदत मिलवन्यात तुम्ही नशीबवान राहता.
१२) खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात अंतर ठेउन असता.
१३) तुम्हाला दुसर्या साठी त्याग करण्याची वेळ वरचेवर येते.
१४) गूढ़ विद्येची आवड असली तरी कनिष्ट दर्जाची विद्या आधिक प्रिय असते.
१५) भावना प्रधान असून ही भावनांवर ताबा ठेउन असता.
१६) वयाच्या २४ वर्षा नंतर उत्कर्ष होतो. विरुद्ध लिंगी व्यक्ति पासून फायदा होतो.
१७) जीवनात मित्र सांगत चांगली ठेवल्यास व व्यसनांच्या आहारी न गेल्यास जीवन सुखी होऊ शकते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) ऐक्याची भावना                                          १) दूरदर्शीपणाचा अभाव 
२) प्रेमळ स्वभाव                                             २) लहरी स्वभाव  
३) शांततेची आवड                                           ३) लाजरे पना 
४) उत्कृष्ट स्मरण शक्ति                                    ४) लुडबुड करण्याची वृत्ति   
५) कलेविषयी प्रेम                                           ५) व्यसनात वाहत जाणारा 


शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरवार,शुक्रवार.
शुभ रंग = गुलाबी,नीला.
मित्र अंक = २,३,६,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

1 comment:

  1. Khup Chhan aani Mi Aapala Aabhari Aahe. Aapan Aapla Phone Number aathva address dila tar pratyksha Bhetu Icchito.
    Pravin Vhawal 9923277808

    ReplyDelete