Monday 23 April 2012

अक्षय्य तृतीया महात्म्य

अक्षय्य तृतीया महात्म्य

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया , नरनारायणजयंती, परशुरामजयंती व हयग्रीव जयंती साजरी करतात, व जर द्वितीया अधिक असेल तर परशुरामजयंती दुसरे दिवशी करतात.जर याच दिवशी 'गौरीव्रत' असेल तर गौरीपुत्र गणेशाची चतुर्थीतिथी अधिक शुभ मानतात. अक्षय्य तृतीया अत्यंत पवित्र व महान फ़ल देणारी तिथी आहे. अक्षय्य तृतीये दिवशी तृतीया तिथी, सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र हे तीन्ही योग असतील तर तो परमश्रेष्ठ योग मानला गेला आहे.

अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे ?

या दिवशी वर दिलेल्या तीन्ही जयंत्या एकत्र येतात, त्यावेळी व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन 'ममाखिलपापक्षयपूर्वक सकल-शुभ फलप्राप्तये भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये' असा संकल्प सोडून परमेश्वराची षोडशोपचारे पूजा करावी. पंचामृतस्नान घालून त्यास सुवासिक फ़ुलांचा हार घालावा. नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जव गहु ,हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ ( गन्धॊदकतिलैमिश्रं सान्नं कुंभं फलाचितम् ) घर्मघट, धान्यपदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे ?

हा सनातनी धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप , होम, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.

अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे ?

या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. ( मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll

२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

विशेष सूचना = ( या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते )

वरील लेख आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. व हि माहिती आपल्या सर्व मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती !

" भाग्यलिखित परिवारातील प्रत्येकाला अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी नांदो... !!! "

धन्यवाद !!!

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

Friday 20 April 2012

मंगळ दोष आणि त्यावरील उपाय !!!



मित्रानो आपण बर्याच वेळा मंगळाची पत्रिका किंवा मांगलिक पत्रिका असे शब्दोच्चार ऐकतो. तर आज आपण या मांगलिक दोषावरची शास्त्र शुद्ध माहिती पाहणार आहोत. सर्व प्रथम आपण या मंगळाचे स्वभाव विशेष पाहूयात म्हणजे तुम्हाला या संपूर्ण विषयाची लगेच कल्पना येईल.

ज्या लोकांना मंगळ दोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी , भांडकुदळ असतो. हे लोक लवकर राग येणारे नि रागाच्या भरात हातून गैर कृत्य घडणारे असतात. यांना राग जसा लवकर येतो तसा तो लगेच जातोही. एक घाव दोन तुकडे करणारा यांचा स्वभाव असतो. छोट्या छोट्या गोष्टी वरून लगेच चिडणारे. खुनशीपणा यांच्या अंगी असतो. तसेच रागाच्या भरात जोरात गाडी चालवणारे लोक हे फक्त मंगळाचेच असतात. तसेच जीवनात कोणत्याही कामास लागणारे धाडस या लोकां मध्ये असते. तसेच अचूक निर्णय क्षमता, जलद क्षणार्धात निर्णय घेणारे आणि एकदा निर्णय घेतला कि परत माघे न वळणारे मग तो निर्णय चूक असो किंवा बरोबर असो हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. प्रभाव शाली झुंझार व्यक्तिमत्व हि या लोकांना मिळालेली निसर्गाची देणगी असते. तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही वाईट प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची ताकद या मंगळाच्या लोकां मध्ये असते. मसालेदार खाणारे तसेच आवडत्या व्यक्ती साठी खर्च करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. हे लोक मुद्दामहून काही तरी खुसपट काढून भांडणे करणारे असतात. तसेच दुसर्याला तोडून बोलणे टोचून बोलणे आणि एखाद्या गोष्टीला लगेच प्रतिसाद देणारे असतात. एखाद्या गोष्टी बद्दल जास्त विचार न करता अविचाराने कृती करणारे असतात. म्हणून हे लोक प्रेमात देखील लगेच पडतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या साठी वाट्टेल ते दीव्य करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच ज्याच्या वर प्रेम करतात त्याचा बदला घ्यायला सुद्धा हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. थोडक्यात काय तर....." भले (नीट वागनार्याशी) तरी देऊ कासेची ( कमरेची) लंगोटी ! नाठाळाचे माथी हाणू काठी !! या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे वागणारे हे लोक वागतात.

मांगलिक व्यक्तींचा सेक्शुअली दृष्ट्या स्वभाव कसा असतो हे आता आपण पाहूयात.

या लोकां मध्ये कामवासना खूप प्रबळ प्रमाणात असते. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि नि:संशय ती व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असते. पण याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.


आत्ता पर्यंत आपण मांगलिक व्यक्तीचे स्वभाव पहिले आता सर्व प्रथम पत्रिकेतील मंगळ दोष म्हणजे काय हे आपण पाहूयात.

पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी ( तनु स्थानी ), चतुर्थ स्थानी ( सुख स्थानी) , सप्तम स्थानी ( विवाह स्थानी ) , अष्टम स्थानी ( मृत्यू स्थानी ) आणि द्वादश स्थानात ( शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. आकृतीत दाखवलेल्या १, ४, ७, ८, १२ या स्थानात ( घरात ) जर मंगळ ग्रह असेल तर त्या पत्रिकेत मंगळदोष आहे असे मानले जाते. किंवा ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते. मंगळ स्वताच्या ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून ४,७,८ या स्थानावर दृष्टी टाकतो. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो. तर १, ४, ७, ८, १२ या घरात मंगळ असता तो व्यक्तीच्या जीवनावर असे काय परिणाम करतो हे आपण आता पाहूयात !

१) प्रथम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत चौथ्या स्थानी (सुख स्थानी), सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ) आणि आठव्या ( मृत्यू ) स्थानावर दृष्टी टाकतो. या मुळे अशा व्यक्तींच्या जीवनात स्वताला अपघात, कुटुंबात कलह , वैवाहिक जोडीदाराशी मत भेद अशा गोष्टी दिसून येतात. व स्वताच्या तप्त स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुषित असते. जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून काही तरी खुसपट काढून भांडणे काढण्याच्या सवई मुळे तसेच जोडीदाराचे सतत दोष दाखवण्याच्या स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुखी असते. यांची तामसिक प्रवृत्ती दांपत्य जीवन व घर दोघांना प्रभावित करते. बहुतेक करून ह्या लोकांना मैदानी खेळाची आवड असते.

२) चतुर्थ स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ), दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , आणि अकराव्या स्थानी ( लाभ स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना विवाहा नंतर नोकरी व्यवसायात अडचणी, आर्थिक विवंचना यांचा सामना करावा लागतो. व त्या मुळे वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतात. या स्थानातला मंगळ व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडवतो व स्वताच्या आईच्या तापट स्वभावा मुळे हा मंगळ दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो. स्वताच्या मनाविरुद्ध आईच्या पसंतीच्या मुलीशी विवाह करावा लागतो. बहुतेक करून या लोकांच्या शिक्षणात अडचणी किंवा अडथळे दिसून येतात.

३) सप्तम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , प्रथम स्थानी ( तनु स्थानी ) व द्वितीय स्थानी ( धन स्थानी ) दृष्टी टाकतो. त्या मुळे या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक विवंचना कायम असतात. तसेच कुटुंबात कायम कलह चालू असतात. येथे वैवाहिक जोडीदार तापट स्वभावाचा व भांडकुदळ मिळतो व या जोडीदाराच्या तापट स्वभावा मुळे दांपत्य जीवनात बाधा निर्माण होते. जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. बहुतेक करून या लोकांच्या नोकरी व्यवसायात अडचणी दिसून येतात. धन लाभ होत नाहीत आर्थिक चिंता कायम सतावत असते.

४) अष्टम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ अकराव्या स्थानी (लाभ स्थानी), दुसर्या स्थानी ( धन स्थानी) आणि तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात प्रवासात चोरी, अपघात,चोरा पासून भय दिसून येते. तसेच सासुर वाडीशी वाद असल्या मुळे हे लोक बायकोस माहेरी पाठवत नाहीत. तसेच यात व्यक्ती स्वताच्या बेजबाबदार वागण्या मुळे सुखांना पारखा होतो आणि स्वताचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य कमी करतो. बहुतेक करून या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या कुंडलीत हा दोष जोडीदाराचे आकस्मित निधन दाखवतो. साधारण पणे अग्नी पासून जीवितास धोका दिसून येतो.

५) द्वादश स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ), सहाव्या स्थानावर ( रोग स्थानी ) आणि सप्तम स्थानी ( विवाह स्थानी) दृष्टी टाकतो. त्या मुळे विवाहा नंतर पाठीवरच्या भावंडाच्या बाबतीत अशुभ फळे मिळतात. पाठीवरच्या भावंडाचा अपघात किंवा त्यासम वाईट गोष्टी घडतात. शैय्या सुख स्थानी असलेला हा मंगळ लैंगिक सुखातून वादविवाद निर्माण करतो. विवाहा नंतर आजारपण किंवा अपघात संभवतो. या स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. बहुतेक करून या स्थानातील मंगळ हा व्यक्तीला कामांध किंवा कामपिपासू बनवतो व शरीर सुखा साठी व्यक्तीला पाप कर्मे करायला प्रवृत्त करतो. म्हणून या स्थानातील मंगळ व्यक्तीस कामांध पणामुळे स्वताच्या दुखास कारणीभूत होत्तो.

मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

१) मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
२) मंगळ कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे) असेल तर.
३) मंगळ उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
४) पत्रिकेत शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
५) पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.
६) मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही.

सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.


मंगळ दोषावर उपाय :-
१) गणेशाची उपासना करणे.
२) हनुमानाची उपासना करणे.
३) दुर्गा मातेची उपासना करणे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतावर सय्यम ठेवणे व त्या साठी रोज सकाळी १० मिनिटे व रात्री झोपताना १० मिनिटे या लोकांनी ध्यानाची सवय लावून घेतली पाहिजे.

मित्रानो या मंगळ दोषावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे परंतु हा लेख खूप मोठा झाल्याने आता लिखाण आवरते घेतो. तरी यातून आपणास बरीच माहिती मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया तसेच आपले या बाबतीतले अनुभव आपण मला कळवावेत व हि माहिती आपल्या मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती.

 !! ओम दत्त चिले ओम !!

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

Saturday 14 April 2012

ll महाशिवरात्री उपासना महिमा ll



सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र :- ll ओम नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो ! "

विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:३० ते २५:२० या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

ll हर हर महादेव ll

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड.

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

ll हनुमान जयंती व हनुमान उपासना महिमा ll



चैत्र शु. पौर्णिमा हाच दिवस महाराष्ट्रात हनुमान जन्मदिन म्हणून सर्वत्र साजरा करतात. ( अश्विन वद्य १४ भूततिथीला चतुर्दशीला मंगळवारी सूर्योदय समयी अंजनीचे उदरी वानर रूपातील एका दिव्य व शक्तिवान बालकाने जन्म घेतला असे मतांतर आहे. ) चैत्र शु.पौर्णिमेलाच मंगळवारी या बालकाने या उगवणाऱ्या सूर्याला फळ समजून त्याला खाण्यासाठी आकाशात झेप घेतली. सूर्याच्या दिशेने उड्डाण करीत येणारा हा बालक राहू आहे असे समजून इंद्राने या बालकावर वज्राने प्रहार केला. त्यामुळे हनुमानाची हनुवटी छाटली गेली, तेव्हा पासून या बालकास हनुमान असे नाव पडले. इंद्राने प्रहार केल्याने हनुमान मूर्च्छा येऊन गलितगात्र झाला व धरणीवर येऊ लागला. त्या वेळी वायुदेव हा सर्व प्रकार पाहत होते व आपल्या या नवजात बालकावर झालेला अन्याय पाहून ते संतप्त झाले. त्यांनी हनुमानाला हवेतच झेलले व सुरक्षित स्थळी ठेवले. या वेळी संतापलेल्या वायू देवाने इंद्राला दंडित करण्यासाठी सर्व विश्वातील वायू संचार रोखून धरला. या मुळे सर्वत्र प्राणी व जीव वायू विना गतप्राण होऊ लागले. तेव्हा वायू देवांना शांत करण्यासाठी ब्राम्हदेवासकट सर्व देवांनी हनुमानाला निरनिराळे वर दिले व वायुदेवांना शांत केले. ब्रम्हा देवाने 'चिरंजीव' होशील व ब्राम्हास्त्राचा कोणताही वाईट परिणाम तुझ्यावर होणार नाही असा वर दिला. इंद्राने कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही असा वर दिला. सूर्यदेवाने आपल्या शतांश इतके तेज हनुमानास दिले तसेच सर्व विद्या मध्ये पारंगत केले. वरून देवाने तुला पाश व जल या पासून अभय प्राप्त होईल असा वर दिला. यमाने यमदंडा पासून अभय दिले. कुबेराने गदा हे अस्त्र हनुमानास भेट म्हणून दिले. शंकरांनी सर्वत्र विजयी होशील असा वर हनुमानास दिला. असा हा हनुमान प्रभू श्रीरामचंद्रांचा सेवक म्हणून धन्यता मानत होता. आणि पुढे तो श्री रामभक्त हनुमान या नावानेच अजरामर झाला. जेथे जेथे श्री रामाचे नाव स्मरण केले जाते तेथे हनुमानाचा निवास असतो. महाभारतात यश प्राप्ती साठी पांडवानी हनुमानास त्यांच्या ध्वजावर विराजमान होण्याची विनंती केली होती नि हनुमानाने ती मान्य केली होती.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
शक्तीचे आणि प्रगल्भ बुद्धीचे दैवत म्हणून हनुमानाची उपासना केली जाते. अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे दैवत म्हणजे हनुमान. साडेसातीच्या काळात शनी देवाच्या प्रकोपा पासून व मिळणाऱ्या वाईट फळा पासून आपला बचाव व्हावा म्हणून हनुमानाची उपासना करतात. ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हनुमानाची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. या हनुमानाला शंकराचा रुद्र अवतार देखील संबोधले जाते. हनुमान उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने हनुमान लगेच प्रसन्न होतो. मग हनुमानाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) श्रीराम नाम :- साध्या राम नामाच्या जपाने सुद्धा अतिप्रसन्न होणारे हे दैवत आहे. जो व्यक्ती रामनामाचा अखंड जप करीत असतो त्याच्यावर हनुमान लगेच प्रसन्न होतात. आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

२) फुले :- लाल रंगाची फुले हनुमंतास खूप प्रिय असतात.

३) वृक्ष :- रुई चे झाड

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- शेंदूर, तसेच लाल रंगाची वस्त्रे, लवंग, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी हनुमानास ( पर्यायाने गरिबांना दान दिल्यास ) भेट दिल्याने हनुमान प्रसन्न होतात.

५) स्तोत्रे :- हनुमान चालीसा पठणाने सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच बजरंग बाणाच्या नित्य पठणाने कामातील सर्व अडचणी दूर होतात.

६) उपासना मंत्र :- !! हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट !!

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री हनुमानाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, खडीसाखर, लाल वस्त्र, नारळ, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- श्री हनुमानाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर श्री हनुमानाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे श्री हनुमानाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण श्री हनुमानाची उपासना केल्यावर हे दैवत नक्कीच प्रसन्न होते. नि प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे हनुमंता मी तुला शरण आलो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील तर तू मला क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. माझ्या मध्ये जी शक्ती जे बळ संचारित होत आहे ती तुझीच कृपा आहे. तुझ्या कृपेने माझ्या कार्यातील सर्व अडचणी दूर होऊन मी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मला यश प्राप्ती होऊ दे ! हे हनुमंता माझे कार्यातील गुप्त शत्रू तसेच उघड शत्रू यांचा नाश कर ! तुझा जय जय कार असो ! "

विशेष सूचना :-
हनुमान पूजन कालावधी :- मंगळवारी तसेच शनिवारी मध्यरात्री पिंपळाच्या वृक्षा खाली बसून वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर हनुमान प्रसन्न होतात. या काळात केलेले हनुमान पूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात हनुमानाची पूजा करावी त्यांना शेंदूर लावावा तसेच रुईची पानें अर्पण करावीत. गूळ खोबरे किंवा शेंगदाणे आणि गूळ हा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. श्री रामाचे नामस्मरण करावे. रामस्तुती किंवा हनुमान चालीसाचा किंवा बजरंग बाणाचा पाठ म्हणावा व मनातली इच्छा बोलावी. आपण जी इच्छा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या हनुमान उपासनेचा महिमा. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी हे जरूर करून पाहावे. व ज्यांना रात्री करणे शक्य नाही त्यांनी दिवसा हि उपासना करावी यश नक्कीच मिळेल.

वरील प्रकारे जर आपण हनुमानाची उपासना केलीत तर कामातील अडथळे दूर होऊन आपणास ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात. भाग्यालीखीत परिवारातील आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

ll श्री राम जय राम जय जय राम ll
!! ओम दत्त चिले ओम !!

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड.

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

घरातील सुख-समृद्धीसाठी सोपे उपाय!



जीवनात सुख आणि समृद्धी मिळावी असे प्रत्येक मनुष्याच स्वप्न असतं. ज्योतिष शास्त्रात असे बरेचसे उपाय आहे ज्यांना नियमितपणे केल्याने तुम्ही जीवनात नक्कीच सुख आणि यश मिळवू शकता. ते उपाय खालील प्रमाणे

१) घरातील प्रत्येक सदस्यांना सूर्योदयाच्या आधी जाग आली पाहिजे व त्यांनी सूर्याचे दर्शन केले पाहिजे. त्याच वेळेस जोराने गायत्री मंत्राचे उच्चारणं केल्याने घरात असणारे वास्तुदोष दूर होतात.

२) सूर्य दर्शनानंतर सूर्याला पाणी, पुष्प आणि अक्षतांचे अर्घ्य द्यायला पाहिजे.

३) झोपेतून उठल्यावर दोन्ही पाय जमिनीवर एकाच वेळेच ठेवायला पाहिजे आणि त्याच वेळेस आपल्या इष्ट देवाची आराधना करून आपल्या हातांना तोंडावरून फिरवायला पाहिजे.

४) अंघोळ व पूजा सकाळी ५ ते ७ च्या दरम्यान केली पाहिजे. म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान केले पाहिजे.

५) घरात तुळस आणि आकड्याचा रोप लावावे आणि त्याची नियमित सेवा केली पाहिजे.

६) पितृ दोषा पासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज पक्ष्यांना दाणा आणि पाणी द्यावे.

७) शनिवारी व अमावास्यांच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करून घरातील पसारा बाहेर काढून जोडे-चपलांचे दान केले पाहिजे.

८) जाणकार ज्योतिषास आपली पत्रिका दाखवून पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी जी स्तोत्रे वाचावयास सांगितली आहेत ती नियमित पणाने ठरलेल्या वेळेत रोज वाचणे.

९) जेवढे जमेल तेवढे भाची-भाच्यांना भेटवस्तू दिली पाहिजे.

१०) घरात जेवण तयार करताना गाय आणि कुत्र्याचा भाग जरूर वेगळा काढावा. याने पितृ दोष नाहीसे होतात.

११) बुधवारी कुणालाही उधार देऊ नये , ते पैसे परत मिळणे अशक्य असते.

१२) राहू काळात कुठलेही शुभ कार्य सुरू करू नये. त्या कार्य सिद्धीस विलंब होतो किंवा अपयश मिळते.

१३) घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पत्रिके प्रमाणे जी इष्ट देवता येईल त्या इष्ट देवाचे जप व पूजन जरूर केले पाहिजे.

१४) घरातील सदस्यांनी अन्न, वस्त्र, तेल, अध्ययन सामुग्री इत्यादींचे दान केले पाहिजे. दान केल्यानंतर दुसऱ्यांकडे त्याचा उल्लेख करणे टाळावे.

१५) आपल्या राशी किंवा लग्न स्वामीच्या ग्रहाच्या रंगाची एखादी वस्तू नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे.

१६) आपल्या घरातील वास्तू देवतेला रोज सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून तो नैवेद्य घरातील कर्त्या पुरुषाने खाल्ला पाहिजे.

१७) घरा मध्ये वाईट शब्दोच्चार टाळले पाहिजेत कारण घरातील वस्तू देवता कायम तथास्तु असे म्हणत असते. तसेच घरात मद्यपान टाळले पाहिजे. कारण घर हे मंदिरा समान असते.

१८) घरात रोज सकाळी एखाद्या मंत्र जप केला पाहिजे किंवा त्या जपाची एखादी सी डी जरूर लावली पाहिजे. या मूळे वास्तूतील बरेचसे दोष कमी होतात.

१९) आपली वास्तु एखाद्या जाणकार वास्तु तद्ण्यास दाखवून वास्तूतील दोषांवर त्वरित उपाय सुरु केले पाहिजेत.

२०) तसेच आपल्या कुंडलीत काही वास्तू दोष दाखवत असेल तर त्या दोषावर त्वरित उपाय सुरु केले पाहिजेत.

२१) प्रत्येकाने रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना किमान १० मिनिटे ध्यानास बसले पाहिजे. याने मनास आणि शरीरास उर्जा प्राप्त होते.

वरील उपाय आपण प्रामाणिक पणे व नियमित केल्यास आपले जीवन कायम स्वरूपी आनंदी होण्यास नक्कीच मदत होईल.


अधिक मार्गदर्शना साठी संपर्क = bhagyalikhit.jyotish@gmail.com

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

घटस्फोट घेण्याआधी हे एकदा जरूर वाचा !!!!


नक्कीच वाचा: वैवाहिक आयुष्य..लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी.. विचार करा..

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ......नक्कीच वाचा: विचार करा.


एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा
अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना
आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय.
हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर...

माझी प्रिय
पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते "प्रेम, जवळीक आणि विश्वास"
वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "
आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आपले आहेत ---
जे प्रेमाचे आहेत---
ते प्राणपणाने सांभाळा.---
नाही तर पश्याताप...!!"

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

तुमचा भाग्यांक कोणता व्यवसाय किंवा करिअर दर्शवतो ?



तुम्ही तुमच्या करीयरच्या बाबतीत चिंतेत असाल तर आता करीयर काऊंसेलरकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या भाग्यंका नुसार तुम्ही करीयरची निवड करू शकता. ती कशी ते आता आपण पाहू......

भाग्यांक १ :
या भाग्यंकाचे लोकांना सतत नाविन्याची आवड असल्याने हे लोक एकाच नोकरी किंवा व्यवसायामध्ये फार काळ राहत नाहीत. सर्वसाधारण पणे ३ ते ४ वर्षांनी नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल करतात. खेळाडू,न्यायव्यवस्था, प्रशासन, परराष्ट्रीय वकील, वैद्यकिय, इलेक्ट्रॉनिक, संशोधन, एखाद्या विभागाचे प्रमुख किंवा म्यानेजर अशा क्षेत्रात रस घेणारे असू शकतात. या कामात जास्त धावपळ करावी लागत नाही. या नंबरच्या लोकांसाठी बौद्धिक काम करायला आवडते.

भाग्यांक २ :
या भाग्यंकाचे लोक सृजनशील असतात. तसेच उत्तम कल्पनाशक्तीचा विकास असल्यामुळे संगीताला चाली लावणे,प्रणय कादंबर्या लिहिणे,पेंटीग,नाट्यकृती, कविता यात यश मिळते. तसेच हे लोक केमिस्ट किंवा प्रयोग शाळेशी साम्भंधित असू शकतात. जल तथा वायूशी संबंधित काम, शिक्षणक्षेत्र, जाहिराती, चित्रपट या व्यवसायांशी त्यांचा संबंध येऊ शकतो. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात. तसेच दुध,द्रव पदार्थ , वनस्पती किंवा भाज्या या क्षेत्राशी सुद्धा यांचा संभंध येतो व या मध्ये हे लोक चांगले यश मिळवताना दिसून येतात.

भाग्यांक ३ :
ज्यांचा भाग्यांक 3 आहे अशा मंडळींचा सर्व सामान्यांचे व समाजाचे कल्याण करण्याकडे ओढा जास्त असतो त्यामुळे हे लोक समाजसेवा, राजकरारण, मंत्री, राजदूत, न्यायाधीश, सचिव, समुपदेशक, शिक्षक अशा कामात यशस्वी होतात. हॉटेल व्यवसाय, शिक्षण, तसेच वैद्यकीय क्षेत्रात हि हे लोक चमकू शकतात. समाजाला प्रबोधन करणे किंवा ज्ञान देणे किंवा समाजाचे भले करणे अशा कामात या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात.

भाग्यांक ४ :
या भाग्यंकाचे लोकांना वेगवान कामात रस असतो. सर्व तर्हेची मशिनरी, इलेक्ट्रिसिटी या कामात धावपळ यांना आवडते. त्याच प्रमाणे विमानाचे पायलट, इंजिनियरिंग, बांधकाम व्यवसायिक, कारखानदार तसेच शास्त्रज्ञ सुद्धा असू शकतात. ही मंडळी लॉटरी, केमिकल, धातूशी संबंधित कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात.

भाग्यांक ५ :
या भाग्यंकाचे लोकांमध्ये कोणत्याही व्यवसायात पडण्याची क्षमता असल्याने जो व्यवसाय कराल त्यात यश मिळेल. मुख्यत्वे व्यापार-व्यवसायात निपुण असतात. या लोकांसाठी शेयर बाजार,शिक्षण क्षेत्र, कॉमर्स, बँकिंग, अकाउंटशी संबंधित कामे यांच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरतात. तसेच छोटे छोटे क्लासेस चालवणे किंवा बोलण्यात व वाद विवाद करण्यात प्राविण्य असल्याने सेल्समन किंवा वकिली क्षेत्रातही नाव कमावतात.

भाग्यांक ६ :
ज्या लोकांचा भाग्यांक ६ असतो ती मंडळी कला क्षेत्रात जास्त प्रगती करतात. सिनेमा, कला, फॅशन, टीव्ही शो, ग्लॅमर वर्ल्ड, पेंटिंग, सजावट, इत्यादी कामात ते निपुण असतात. या क्षेत्रात त्यांना यशही भरपूर मिळते. तसेच आर्किटेक, इंटिरियर डिझायनर, जवाहीर तज्ञ , संगीत तज्ञ, हॉटेल म्यानेजर किंवा मेवा मिठायीच्या व्यवसायात देखील खात्रीशीर यश मिळवतात. त्याच प्रमाणे जमीन जुमल्याचे व खरेदी-विक्रीचे दलाल, मोबदला घेऊन काम करणारे दलाल इत्यादी व्यवसायात सुद्धा यश मिळवतात.

भाग्यांक ७ :
ज्यांचा भाग्यांक ७ आहे अशा लोकांना परदेशा बद्दल फार आकर्षण असल्याने परदेशातील मालाची ने आण करण्याच्या व्यवसायात तसेच पर्यटन व्यवसायात या लोकांना खात्रीशीर यश मिळते. यांना नोकरीपेक्षा व्यापार जास्त फायदेशीर ठरतो. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, जहाजावर काम करणारे अशा ठिकाणी सुद्धा हे लोक नाव कमावतात. त्याच प्रमाणे वैद्यकीय व्यवसायात सुद्धा हे लोक चमकतात.

भाग्यांक ८ :
ज्यांचा भाग्यांक ८ अशा व्यक्ती पोलिस, सैन्यदल, सिक्युरिटी, टुरिझम, वकिल बनू शकतात. तसेच खाणी, लाकूड , लोखंड, जमीन, पाळीव प्राणी व स्टीलच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना यश मिळू शकते. तसेच हे लोक उत्तम व्यवस्थापक व कंपनी सेक्रेटरी होऊ शकतात. तसेच जेथे सेवा नि कनिष्ट कामे करण्याची परिस्थिती असते अशा ठिकाणी हे लोक दिसून येतात. उ द. प्रिंटींग प्रेस परंतु या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात खूप कष्ट घ्यावे लागतात. या लोकांना कष्टाच्या प्रमाणात यश थोडे कमी व उशिरा मिळते.

भाग्यांक ९ :
या भाग्यंकाचे लोक प्रत्येक क्षेत्रात सापडतात जेथे धैर्य व आक्रमकता आहे अशा क्षेत्रात म्हणजेच पोलीस किंवा सैन्यात यांना यश चांगले मिळते व सैन्यात जबाबदारीच्या जागा हे लोक पटकावतात. तसेच हे लोक बोलण्यात माहिर असल्यामुळे नेता, सरकारी अधिकारी, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडियो जॉकी बनू शकतात. तसेच हे लोक उत्तम डॉक्टर, केमिस्ट किंवा लोखंडाच्या साम्भंधित आपला स्वता:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे अवघड जाते.

जीवनात कुठल्या ही करियरची निवड करण्या अगोदर फक्त आपण आपली आवड नव्हे तर आपली योग्यता व आपला भाग्यांक या कडे सुद्धा तुम्ही लक्ष दिले तर करियर मध्ये यश मिळवणे नक्कीच सोपे होईल. वरील माहितीचा आपणास आपल्या जीवनात नक्कीच फायदा होईल !


तसेच या माहितीला अनुसरून करिअर मधील तुमचे अनुभव आपण मला कळवावेत. व माझ्या निरीक्षणातील अचूकता किती आहे यावर देखील आपण आपले मत द्यावे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

सकाळी तळहाताचे दर्शन शुभ :-



सकाळच्या पहरी झोपेतून उठल्यानंतर आपण जर लांब असलेली वस्तू पाहिली तर आपल्या नाजूक डोळ्याना त्रास होतो व त्याचा विपरीत परिणामाला आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी दोन्ही तळ हाताचे दर्शन घ्यावे, असे ज्योतीषशास्त्रात आवर्जन सांगण्यात आले आहे. मानवाच्या जीवनावर चार पुरूषार्थांचा (धर्म, अर्थ, कर्म व मोक्ष) मोठा प्रभाव आहे. या पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी तळ हातांचे दर्शन घेऊन पुढील मंत्राचा एक वेळा जप केला पाहिजे.

''कराग्रे वसती लक्ष्मी:, करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंद:,प्रभाते कर दर्शनम्।।''
काही वेळेच 'गोविंद' ऐवजी 'ब्रम्हा' असे ही उच्चारले जाते.

अर्थात:-
तळ हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी विद्यादात्री सरस्वती व मूळभागात (मनगटाची बाजू) गोविंद म्हणजेच ब्रम्हाचा निवास असल्याने त्यांच्या दर्शनाने आपल्या प्रत्येक दिवसाचा प्रारंभ झाला पाहिजे. त्यामुळे चांगल्या फळाची अपेक्षापूर्ती होते. सकाळी उठल्यानंतर दिवसभरात आपल्या हातून शुध्द व सात्विक कार्य होण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तसेच आपण कुणावही विसंबून न राहता परिश्रम करून कर्म-फल-त्याग यांची भावना जागृत करत असते. मंत्र जाप करत असताना दोन्ही तळ हात एकमेकांवर घासून आपल्या चेहर्‍यावर लावले पाहिजे. असे केल्याने दिवसमरातू आपली सगळी कामे शुभ होतात.

ही कृति आपना सर्वाना सहज जमन्या सारखी आहे, तेव्हा प्रत्येकाने रोज न चुकता असे वर्षभर करा, नि जीवन सुखी व आनंदी बनवा.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

व्यक्तिमत्व आणि ज्योतिष :- विकृतपणा आणि विषण्णता


व्यक्तिमत्वातील एक दोष नैराश्य किंवा मानसिक अस्वस्थता यांचा ज्योतिष माध्यमातून शोध शक्य आहे का?
तर उत्तर आहे हा शोध घेणे सहज शक्य आहे..... या साठी प्रथम दोन भागात याचे विभाजन करावे लागेल. १) मानसिक विकृती २) मानसिक विषण्णता किंवा नैराश्य

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून पहिले असता व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता यांचा सरळ संबंध 'मून' म्हणजे चंद्राशी असतो.
या मध्ये आपण प्रथम विकृतीच्या लक्षणांचा विचार करू, मनुष्याच्या स्वभावात विकृती येण्यास जर पत्रिके मध्ये चंद्रा बरोबर मंगळ देखील बिघडला असेल तर हा दोष दिसून येतो.
विकृतीची लक्षणे =
१) बोलघेवडेपणा
२) अनिद्रा ( झोप न येणे)
३) चिडचिडेपणा किंवा मारहाण करणे
४) लैंगिकसुख घेताना यातना देणे किंवा घेणे
५) चुलबुलेपणा
६) सतत एकटक पाहत राहणे
७) अतिसाक्रियाशीलता
८) आक्रस्ताळेपणा
९) विचारात आणि वागण्यात चढउतार

आता विषण्णता म्हणजेच नैराश्याच्या लक्षणांचा विचार करू, मनुष्याच्या स्वभावात नैराश्य येण्यास चंद्रा बरोबर जर शनी देखील बिघडला असेल तर हा दोष निर्माण होतो या मध्ये शनी चन्द्र युती किंवा अन्य वाईट योग कारणीभूत ठरतात.
विषण्णताची लक्षणे =
१) एकलकोंडेपणा
२) नकारात्मक विचार येणे
३) लैंगिक इच्चा कमी होणे
४) आत्म्हत्तेचे विचार येणे
५) अपयशी पनाची भावना येणे
६) आळस येणे व अंधार करून सतत झोपून राहणे
७) कोणत्याही गोष्टीमध्ये सतत चुका काढणे
८) उदास होऊन सतत रडत किंवा कुढत बसने
९) स्वताहून कोणते कार्यात सहभागी न होणे

या शिवाय लहानसहान गोष्टींवरून चिडणे, थोड्या थोड्या वेळात मूड बदलणे, एखाद्या गोष्टीविषयी अतिप्रेम दाखविणे, अतिसंवेदनशील आणि पझेसिव्ह असणे, ह्या गोष्टी नॉर्मल दिसतात. पण हे आपल्यात असणारे व्यक्तिमत्व दोष ( म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता ) असू शकतात. म्हणून जर अशी परिस्थिती सतत बनत असेल तर तुम्हाला तुमच्या पत्रिकेवर एक नजर मारणे गरजेचे आहे. आणि त्याच वेळी योग्य अशा मानस उपचार तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहता पत्रिके मध्ये कर्क राशी किंवा कर्क लग्न असेल तर व्यक्ती अतिसंवेदनशील किंवा जास्त गर्विष्ठ स्वभाव असू शकते. अशा परिस्थितीत चंद्र जर दुर्बळ असला तर शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता असू शकते. इतर राशींमध्ये चंद्र 3,6 किंवा 8 घरात असेल आणि दुर्बळ, जन्म कृष्ण पक्ष किंवा अमावास्यांच्या असेल तरी जातकात शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता संभव आहे. त्याच प्रमाणे चंद्रावर केतूचा प्रभाव असेल, किंवा चंद्र केतूसोबतच असतील किंवा चंद्राची युती शनी व केतूसोबत असेल किंवा एकट्या शनीबरोबर असल्यास व्यक्तीत शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता असण्याची शक्यता जास्त असते. तसेच चंद्रासोबत मुख्य ग्रहसुद्धा दुर्बळ असतील, गुरू दुर्बळ असून चवथे घरसुद्धा दुर्बळ असेल तर व्यक्ती नैराश्य आणि अशांतीची शिकार होते. यात जर मंगळ उग्र असेल तर ही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता आक्रमकतेत बदलू शकते. म्हणजे मारझोड करणे, हिंसक होणे, झटके येणे इत्यादी. वरील दोषांमध्ये व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊ शकते.

पत्रिकेत वर दिलेल्या लक्षणांपैकी एखादेही लक्षण दिसत असेल तर मुख्य ग्रह आणि चंद्राला प्रबळ करण्याचा प्रयत्न करावा. इष्टदेवाची आराधना करावी आणि ध्यान-प्राणायाम जरूर करावा. व त्याच बोरोबर योग्य अशा मानस उपचार तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

नक्षत्र स्वभाव निश्चित करतात! भाग - १



आपले स्वताचे जन्म नक्षत्र पाहून (जन्म नक्षत्र म्हणजे तुमच्या कुंडलित चन्द्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र) त्यानुसार आपले मत कलवा !!!!

नक्षत्राची एकूण संख्‍या 27 आहे. एक राशी अडीच नक्षत्राची असते. अशा प्रकारे 12 राशी तयार झाल्या आहेत. या नक्षत्रावर आपला स्वभाव निर्धारित होत असतो.

1. अश्विनी-
बौद्धिक प्रगल्भता, तेज स्मरणशक्ती, चंचल व चतुराई असे गुण अश्विनी नक्षतत्रात जन्मलेल्या लोकांच्या अंगी असतात.

2. भरणी-
स्वार्थी वृत्ती, स्वकेंद्रित न होणे तसेच स्वतंत्र निर्णय क्षमतेचा अभाव असणे.या नक्षत्राचा स्थायी भाव आहे.

3. कृतिका-
कृतिका नक्षत्रात जन्मलेले लोक अधिक संतापी, आक्रामक व अहंकारी असतात मात्र त्यांना शस्त्र, अग्नी व वाहन यांच्यापासून भीती असते.

4. रोहिणी-
रोहिणी नक्षत्रात जन्म घेतलेले लोक प्रसन्न, कलेत प्राविण्य मिळवणारे, निर्मळ मनाचे व उच्च अभिरुचि असणारे असतात.

5. मृगराशी-
बु्ध्दीवादी व भोगवादी यांचा समन्वय, उत्तम बुध्दीमत्ता तसेच यांचा वापर चांगल्या कार्यासाठी करणे, हा नक्षत्राच्या लोकांचे विशेष म्हणावे लागेल.

6. आर्द्रा-
आर्द्रा नक्षत्र असणारे लोक खुप संतापी असतात. निर्णय घेताना ते नेहमी द्विधा मन:स्थितीत सापडतात. ते संशयीही असतात.

7. पुनर्वसु-
पुनर्वसु नक्षत्र असणारे लोक शांतताप्रिय असतात. अध्यात्मात अधिक रुची घेत असतात.

8. अश्लेषा-
जिद्‍दी स्वभावामुळे कधीकधी असे लोक अविचारी होऊन बसतात. कोणावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु प्रत्येक कामात 'आ बैल मुझे मार' असे करत नेहमी वादळाला आमंत्रण देत असतात.

9. मघा-
स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्च महत्वाकांक्षी व सहज नेतृत्व असे गुण मघा नक्षत्र असणार्‍यांमध्ये असतात.

10. पूर्वा-
पूर्वा नक्षत्र असणारे लोक श्रद्धाळु, कलाप्रेमी, रसिक व छंदी असतात.

11. उत्तरा-
या नक्षत्राचे लोक अधिक संयमी तसेच व्यवहारशील व अत्यंत परिश्रमी असतात.

12. हस्त-
कल्पनाशील, संवेदनशील, सुखी, समाधानी लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

13. चित्रा-
लेखक, कलाकार, रसिक तसेच भिन्नलिंगी आकर्षण आदी गुण चित्रा नक्षत्रात जन्म घेणार्‍यांमध्ये जाणवतात.

14. स्वाती-
संयमी, मनावर नियंत्रण, समाधानी वृत्ती तसेच दु:खा खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता या लोकांमध्ये असते.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

नक्षत्र स्वभाव निर्धारित करतात! भाग - २


आपले स्वताचे जन्म नक्षत्र पाहून (जन्म नक्षत्र म्हणजे तुमच्या कुंडलित चन्द्र ज्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र) त्यानुसार आपले मत कलवा !!!!

15. विशाखा-
स्वार्थी, जिद्‍दी तसेच आपलीच टिमक‍ी वाजविणे असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. आपला उल्लू सिदा करण्यात ही मंडळी माहिर असते.

16. अनुराधा-
कुटुंबवत्सल, श्रृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.

17. ज्येष्ठा-
स्वभाव निर्मळ परंतु शत्रु ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात.

18. मूल-
ज‍ीवनाचा पूर्वार्ध कष्टदायी व उत्तरार्ध सुखात जात असतो. कुटुंबात ही व्यक्ती रमताना दिसत नाही. राजकारणात या व्यक्तीचा हात कोणी धरू शकत नाही. कलाप्रेमी व कलाकार या नक्षत्रात जन्म घेतात.

19. पूर्वाषाढा-
शांत, धावपळ न करणारे, समाधानी व ऐश्वर्य प्रिय व्यक्ती या नक्षत्रात जन्म घेतात.

20. उत्तराषाढा-
विनयशील, बुध्दीमान, अध्यात्मात रूची घेणारे व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

21. श्रवण-
श्रद्धाळू, परोपकारी, कतृत्ववान असा या व्यक्तीचा स्वभाव असतो.

22. धनिष्ठा-
धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात.

23. शततारका-
व्यसनाधीनता आणि कामवासनेकढे हे नक्षत्र असणारे लोक अधिक झुकतात.

24. पुष्य-
पुष्य नक्षत्र असणारे लोक दानप्रिय व बुध्दीमान असल्याने समाजात एक वेगळ्या प्रकारचे वलय तयार करत असतात. या लोकांचा जनसंपर्कही दांडगा असतो.

25. पूर्व भाद्रपदा-
अधिक बुध्दीमान, संशोधक वृत्त‍ी तसेच वेळ व काळानुसार चालणारे कुशल लोक या नक्षत्रात जन्म घेतात.

26. उत्तरा भाद्रपदा-
मोहक चेहरा, संवादकौशल्याने निपून, चंचल व इतरांना चटकण मोहून घेणे, हा स्वभाव या नक्षत्रात जन्म घेणार्‍या लोकांचा असतो.

27. रेवती-
रेवती नक्षत्र असणारे लोक सत्यवादी, निरपेक्ष, विवेकप्रधान असतात. ते नेहमी जनकल्याणासाठी झटत असतात.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

बहुपयोगी रुद्राक्ष


शिव पुराणात रुद्राक्षाच्या निर्मितीची कथा दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शंकरांने कठोर तपानंतर डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूचे काही थेंब खाली पडले. अश्रूच्या त्याच थेंबातून रुद्राक्ष नावाचा वृक्ष तयार झाला. त्यालाच रुद्राक्षाची निर्मिती म्हटली गेली आहे.

रुद्राक्ष (रुद्र+अक्ष) शंकराच्या डोळ्यांचे प्रतिरूप आहे. यामुळेच भगवान शिवाला रूद्राक्ष‍ प्रिय आहे. रुद्राक्षाचे दर्शन, स्पर्शाने अनेक पाप व दुष्कर्मांचा नाश होतो. रुद्राक्ष धारण केल्याने विविध प्रकारचे फायदे होतात. रुद्राक्षाचा प्रामुख्याने धार्मिक कार्यात वापर होतो. पण त्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत. यामुळेच हदयरोग आणि रक्तदाब निवारण्यासाठी रुद्राक्ष महत्वाचे भूमिका पार पाडतो.

मोठ्या संकटातून सुटका होण्यासाठी केला जाणारा महामृत्यूंजय जप रुद्राक्षापासून तयार होणार्‍या माळेवरच केला जातो. उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुध्दा त्याचा जप केला जातो. रुद्राक्ष एक अमोघ शक्ती असल्यामुळेच साधू-संताकडून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शंकराचे स्वरुप म्हणून रूद्राक्ष शुभ, पवित्र आणि कल्याणकारी मानला जातो.

रुद्राक्ष चवीने आंबट, रुचीवर्धक, वात, कफनाशक आहे. मधाबरोबर घासून त्याचे सेवन केल्यास मधुमेहापासून मुक्ती मिळण्यासाठी त्याची मदत होते. शिवपुराणात भूतबाधा आणि ग्रह पिडेपासून रुद्राक्षामुळे मुक्ती मिळत असल्याचे म्हटले आहे. रुद्राक्ष गळ्यात किंवा हातात बांधल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रुद्राक्षाच्या बियांवर पाच रेषा असतात. त्याला रुद्राक्षचे मुख म्हटले जाते.

सोमवार हा दिवस रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वांत श्रेष्ठ आहे. त्यासाठी शिवमंदिरात बसून मंत्र जप करावा. त्यानंतर शिवलिंगास स्पर्श करुन रुद्राक्ष धारण करावे. शिवपुराणात म्हटले आहे की जेथे रुद्राक्षाची पूजा-अर्चा विधिवत होते तेथे लक्ष्मीचा वास असतो. रुद्राक्ष पाण्यात तरंगत असेल तर तो कच्चा असतो. परंतु, पाण्यात बुडत असल्यास तो योग्य किंवा खरा समजला जातो.

रुद्राक्षाला एका दोर्‍यात बांधून गर्भवतीच्या पोटावर लटकविल्यास त्याच्या फिरण्याच्या गतीवरून गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे समजू शकते. एक मुखीपासून चौदा मुखीपर्यंतचे रुद्राक्ष धारण करण्यासाठी शिवपुराणात हे मंत्र आहेत.

(1) ॐ हीं नमः, (2) ॐ नमः, (3) ॐ क्लिंनमः, (4) ॐ हीं नमः, (5) ॐ ही नमः, (6) ॐ हीं हूं नमः, (7) ॐ हूं नमः, (8) ॐ हूं नमः, (9) ॐ हीं हूं नमः, (10) ॐ हीं नमः, (12) ॐ हीं हूं नमः, (12) ॐ क्रौं क्षौ रौ नमः, (13) ॐ हिं नमः व (14) ॐ नमः

अशा प्रकारे धार्मिक महत्त्वाबरोबर औषधी गुणांचा खजिना म्हणून रुद्राक्षाची ओळख आहे. त्याला श्रध्दा आणि विश्वासाने धारण करावे.
धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

राशीनुसार परफ्यूम वापरा आणि जीवनात आनंद मिळवा.



जर राशीनुसार परफ्यूम अथवा डियो वापरले तर राशी स्वामी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतो. राशीनुसार परफ्यूम वापरल्याने आपल्या दिवसाचीही सुरवात चांगली होते. आणि हो आपल्या कामात आपला उस्ताह टिकून राहतो व त्याचा परिणाम म्हणून हाती घेतलेले काम पूर्ण होते.

मेष- या राशीच्या लोकांनी मोगर्‍याचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

वृषभ- या राशीच्या लोकांनी चमेलीचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

मिथुन- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

कर्क- या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

सिंह- या राशीच्या लोकांनी गोड सुगंध अथवा चॉकलेट फ्लेवर असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

कन्या- या राशीच्या लोकांनी बदामाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

तुळ- या राशी स्वामी शुक्र देव आहे. त्यानुसार या राशीच्या लोकांनी चॉकलेट आणि चमेलीचा सुगंध असलेला परफ्युम वापरावा.

वृश्चिक- गुलाबाचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतो.

धनु- या राशीच्या लोकांनी चंदनाचा सुगंध असलेला परफ्युम अथवा डियो वापरावा.

मकर- या राशीच्या लोकांनी एनर्जेटीक सुगंध असलेला परफ्युम वापरावा. उदा. लेमन फ्लेवर.

कुंभ- ताजगी देणार्‍या सुगंध असलेला परफ्यूम या राशीचे लोक वापरू शकता. उदा. एक्वा फ्लेवर

मीन- कस्तुरीचा सुगंध असलेला परफ्युम या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल.


धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड


संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

श्री व्यंकटेश्वर ( बालाजी )



बालाजी ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे.

मूर्ती

बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी मढलेली असते. मूर्तीची उंची २ मीटर आहे.
तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिश्चन धर्मस्थळानंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो. मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली आहे.

इतिहास

मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती परंपरेने स्वयंभू मानन्यात येते. लोककथेनुसार तिरुपतीच्या डोंगरावर ( तिरुमला) मोठे वारुळ होते. एका शेतकऋयास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्यांना भरविण्याची आज्ञा झाली. स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली व स्वतःच त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.

ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिराचा काळ किमान २००० वर्षे आहे. पल्लव राणी समवाईने इस. ६१४ मध्ये येथिल पहिली वेदी बांधली. तमिळ संगम साहित्यात (काळ: इसपूर्व ५०० - इस २००) या स्थानाचा उल्लेख आहे. चोळा व पल्लव साम्राज्यांनी मंदिराला दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत. चोळा राज्यकालात मंदिराच्या वैभवात वाढ झाली. १५१७ मध्ये कृष्णदेवराय राजाने दिलेल्या दानाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यात आला. मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी मंदिराच्या कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था केली. त्यानंतर म्हैसूर व गदवल संस्थानांद्वारे ही मंदिराला मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था १९३३ पर्यंत सुरु होती. प्रशासकास विचरणकर्ता असे म्हणतात. १९३३ साली मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीची स्थापना करण्यात आली. या समितीवर मद्रास सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असे. सध्या देखील मंदिराची व्यवस्था तिरुमला तिरुपती देवस्थानम विश्वस्त पाहतात.
तिरुमला रांगा मध्ये एकूण ७ डोंगर आहेत. मंदिर मुख्य शहरापासून सडकरस्त्याने २० किंमी अंतरावर आहे. बरेचसे यात्रेकरु ११ किमीची चढाई करणे देखील पसंत करतात. येथे रोज जवळपास ५०,००० दर्शनार्थी असतात.

ऊत्सव

ब्राह्मोत्सवम हा येथिल मुख्य उत्सव आहे.

वरील माहिती वाचनीय असून आपणास त्याचा नक्कीच उपयोग होईल.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

जन्मकुंडलीचा अर्थ आपल्या शरीरिक रचनेनुसार



जन्मकुंडलीच्या बारा घरांचा अर्थ आपल्या शरीरिक रचनेनुसार लावला जात असतो. कुंडली 12 घरे असतात. प्रत्येक घर शरीराचे विविध अवयव दर्शवित असतो. शेवटी कुंडलीतील ज्या घरातील स्वामी ग्रह किंवा स्वयं ते घर कमजोर असेल तर त्या संबंधित शरीराच्या अवयवाला त्रास संभवतो. कुंडलीपाहून रोगाचे निदान ही केले जात असते व त्यावर उपाययोजनाही सुचविली जात असते. तर आता आपण पाहूयात कि कुंडलीची हि बारा घरे आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम करतात.

कुंडलीतील घर व शरीराचा अवयव

पहिले घर - मस्तक, डोके
दुसरे घर - नाक, कान, मान, डोळे
तिसरे घर - हात, खांदे
चवथे घर - छाती, स्तन, पोट
पाचवे घर - पाठ, बरगळ्या, नाभी
सहावे घर - आतडे, गर्भाशय
सातवे घर - मूत्राशय, कंबर
आठवे घर - गुदाद्वार, गुप्तांग
नववे घर - जांघ
दहावे घर - गुडघे
अकरावे घर - कोपरे
बारावे घर - तळ हात व पाय.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय?


भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या लेखात केला आहे, आपणास हा लेख आवडल्यास जरूर शेअर करा.


मंदिरात का जावे या मागचे आपल्या शास्त्रीय कारण काय असेल ?

अनादी काळा पासून मनुष्य इश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे. आता या ईश्वरी शक्ती म्हणजे काय ? किंवा त्या आपले अस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल. माझ्या " ज्योतिष खजाना एक वरदान या पेज वरील " !! ध्यान तंत्र आणि ध्यानातील शक्ती !! या लेखा मध्ये ईश्वरी शक्ती विषयी सर्व सविस्तर माहिती दिली आहे तो लेख आपण आवश्य पाहावा.

सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू !

शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती ( power ) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा - इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो व त्यातून त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत: मध्ये चुंबकीय ( क्षेत्र ) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. त्यालाच आपण
ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे.
आणि हे मध्यम होते पिर्यामीड. पिर्यामीड ज्या विशिष्ट कोनातबांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरे हि या पिर्यामिडच्या आकाराची बांधली आहेत. मंदिराचा कळस हा एक पिर्यामिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांना कळस हा मुख्य भाग मानला जातो तसेच हि सर्व
मंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा - तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर, पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वेदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत. ( किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्यामिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत ) नि फक्त हिंदू संस्कृतीतच नवे तर मुस्लीम, ख्रिचन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे.

हि मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय?

कारण अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे . या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते ? तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि डोंगर हा पिर्यामीडचाच एक नैसर्गिक उत्तम प्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात . व याच कारणाने मुख्य मूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते , त्याला " गर्भगृह" किवा " मूलस्थान " असे म्हटले जाते . खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा " गाभारा " म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा. आपल्याला माहित आहे का , ताम्रपटावर काही वेदिक मंत्र लिहून त्या मुख्य मूर्तीच्या पायाखाली पुरल्या जात असत . ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते ? तर हे ताम्रपात्र म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात.

मंदिरात प्रदिक्षिणा का घालतात ?

याचे हि उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक गोलाकार चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटर च्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो. म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करते त्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते . ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीय दृष्ट्या, ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात. व या आपणास या मंदिरातूनच प्राप्त होतात. मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपना मधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील तान तणाव कमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा ,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना ( दुख ) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते . ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

मंदिरातील “तीर्थ “ म्हणजे काय ?

मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध ,दही, वेलचीपूड, कापूर ,
केसर, लवंग तेल , तूप , तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण " तीर्थ ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते . ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते , केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो.
चुंबकीय शक्तीने भरलेले हे “ तीर्थ ” रक्तशुद्धी करते. हेप्रयोग वरून सिद्ध झाले आहे . म्हणूनच हे “ तीर्थ “ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते .ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे . ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा, भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक ) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील , पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “ दीपाराधना “ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात . मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आणि म्हणूनच काही मंदिरात पुरुषांना अंगवस्त्र घालण्यास मनाई आहे ( दक्षिणे कडील देवळात) आणि तसेच महिला भक्तांना अंगावर आभूषण घालण्यास सांगितले जाते. ह्या आभूषण द्वारे ( सोने , चांदी विद्युत शक्ती प्रवाहक आहेत ) महिलांना सकारात्मक शक्ती मिळवण्यास मदत होते . आपल्याकडे नवीन विकत घेतलेले दागिने प्रथम देवाच्या चरणासी ठेवून मगच घातले जाते. तसेच काही नवीन वस्तू ( पुस्तके ,वाहन ) देवाचा आशीर्वाद घेवून मगच वापरल्या जातात तसेच कोणत्याहि शुभ कार्यास सुरवात करण्या आधी मंदिरात जाऊन देव दर्शन घेऊन त्या देवतेचा आशीर्वाद घेणे त्या मागे सुधा हीच भावना असते असे दिसून आले आहे.

दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीने आपल्याला खूप प्रसन्न वाटते . देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यता मुख्य मूर्ती च्या सभोवती पसरलेल्या असतात , ज्या आपल्या शरीर व मेंदू खेचून घेते . तुम्हाला माहित आहे का , प्रत्येक वैष्णव ( विष्णू भक्त ) दररोज २ वेळा

विष्णू मंदिरात पूजा करतो. आपल्या पूजा पद्धती ह्या एवढ्या कठीण नाहीत. किवा कोणी एका माणसाने अथवा त्याच्या भक्तांनी आपल्या पूजा पद्धती ठरवलेल्या नाही आहेत . ह्या सगळ्या पूजा पद्धती, आपल्या पूर्वजांनी योग्य अभ्यास , संशोधन व शास्त्रीय निकषावरून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी शोधून काढल्या आहेत. आता प्रश्न हाच आहे कि ह्या सगळ्या शास्त्रीय व संशोधन करून शोधलेल्या पद्धती आपल्या कडून पाळल्या जातात का?

ह्या लेखाद्वारे आपली मंदिरे व आपल्या देवपूजा पद्धतीमागील शास्त्र उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे. त्या वर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.

!! ओम दत्त चिले ओम !!


आपला मित्र,

सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

मंगळ दोष आणि त्यावरील उपाय !!!


मित्रानो आपण बर्याच वेळा मंगळाची पत्रिका किंवा मांगलिक पत्रिका असे शब्दोच्चार ऐकतो. तर आज आपण या मांगलिक दोषावरची शास्त्र शुद्ध माहिती पाहणार आहोत. सर्व प्रथम आपण या मंगळाचे स्वभाव विशेष पाहूयात म्हणजे तुम्हाला या संपूर्ण विषयाची लगेच कल्पना येईल.

ज्या लोकांना मंगळ दोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी , भांडकुदळ असतो. हे लोक लवकर राग येणारे नि रागाच्या भरात हातून गैर कृत्य घडणारे असतात. यांना राग जसा लवकर येतो तसा तो लगेच जातोही. एक घाव दोन तुकडे करणारा यांचा स्वभाव असतो. छोट्या छोट्या गोष्टी वरून लगेच चिडणारे. खुनशीपणा यांच्या अंगी असतो. तसेच रागाच्या भरात जोरात गाडी चालवणारे लोक हे फक्त मंगळाचेच असतात. तसेच जीवनात कोणत्याही कामास लागणारे धाडस या लोकां मध्ये असते. तसेच अचूक निर्णय क्षमता, जलद क्षणार्धात निर्णय घेणारे आणि एकदा निर्णय घेतला कि परत माघे न वळणारे मग तो निर्णय चूक असो किंवा बरोबर असो हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. प्रभाव शाली झुंझार व्यक्तिमत्व हि या लोकांना मिळालेली निसर्गाची देणगी असते. तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही वाईट प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची ताकद या मंगळाच्या लोकां मध्ये असते. मसालेदार खाणारे तसेच आवडत्या व्यक्ती साठी खर्च करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. हे लोक मुद्दामहून काही तरी खुसपट काढून भांडणे करणारे असतात. तसेच दुसर्याला तोडून बोलणे टोचून बोलणे आणि एखाद्या गोष्टीला लगेच प्रतिसाद देणारे असतात. एखाद्या गोष्टी बद्दल जास्त विचार न करता अविचाराने कृती करणारे असतात. म्हणून हे लोक प्रेमात देखील लगेच पडतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या साठी वाट्टेल ते दीव्य करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच ज्याच्या वर प्रेम करतात त्याचा बदला घ्यायला सुद्धा हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. थोडक्यात काय तर....." भले (नीट वागनार्याशी) तरी देऊ कासेची ( कमरेची) लंगोटी ! नाठाळाचे माथी हाणू काठी !! या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे वागणारे हे लोक वागतात.

मांगलिक व्यक्तींचा सेक्शुअली दृष्ट्या स्वभाव कसा असतो हे आता आपण पाहूयात.

या लोकां मध्ये कामवासना खूप प्रबळ प्रमाणात असते. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि नि:संशय ती व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असते. पण याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.


आत्ता पर्यंत आपण मांगलिक व्यक्तीचे स्वभाव पहिले आता सर्व प्रथम पत्रिकेतील मंगळ दोष म्हणजे काय हे आपण पाहूयात.

पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी ( तनु स्थानी ), चतुर्थ स्थानी ( सुख स्थानी) , सप्तम स्थानी ( विवाह स्थानी ) , अष्टम स्थानी ( मृत्यू स्थानी ) आणि द्वादश स्थानात ( शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. आकृतीत दाखवलेल्या १, ४, ७, ८, १२ या स्थानात ( घरात ) जर मंगळ ग्रह असेल तर त्या पत्रिकेत मंगळदोष आहे असे मानले जाते. किंवा ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते. मंगळ स्वताच्या ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून ४,७,८ या स्थानावर दृष्टी टाकतो. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो. तर १, ४, ७, ८, १२ या घरात मंगळ असता तो व्यक्तीच्या जीवनावर असे काय परिणाम करतो हे आपण आता पाहूयात !

१) प्रथम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत चौथ्या स्थानी (सुख स्थानी), सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ) आणि आठव्या ( मृत्यू ) स्थानावर दृष्टी टाकतो. या मुळे अशा व्यक्तींच्या जीवनात स्वताला अपघात, कुटुंबात कलह , वैवाहिक जोडीदाराशी मत भेद अशा गोष्टी दिसून येतात. व स्वताच्या तप्त स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुषित असते. जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून काही तरी खुसपट काढून भांडणे काढण्याच्या सवई मुळे तसेच जोडीदाराचे सतत दोष दाखवण्याच्या स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुखी असते. यांची तामसिक प्रवृत्ती दांपत्य जीवन व घर दोघांना प्रभावित करते. बहुतेक करून ह्या लोकांना मैदानी खेळाची आवड असते.

२) चतुर्थ स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ), दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , आणि अकराव्या स्थानी ( लाभ स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना विवाहा नंतर नोकरी व्यवसायात अडचणी, आर्थिक विवंचना यांचा सामना करावा लागतो. व त्या मुळे वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतात. या स्थानातला मंगळ व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडवतो व स्वताच्या आईच्या तापट स्वभावा मुळे हा मंगळ दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो. स्वताच्या मनाविरुद्ध आईच्या पसंतीच्या मुलीशी विवाह करावा लागतो. बहुतेक करून या लोकांच्या शिक्षणात अडचणी किंवा अडथळे दिसून येतात.

३) सप्तम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , प्रथम स्थानी ( तनु स्थानी ) व द्वितीय स्थानी ( धन स्थानी ) दृष्टी टाकतो. त्या मुळे या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक विवंचना कायम असतात. तसेच कुटुंबात कायम कलह चालू असतात. येथे वैवाहिक जोडीदार तापट स्वभावाचा व भांडकुदळ मिळतो व या जोडीदाराच्या तापट स्वभावा मुळे दांपत्य जीवनात बाधा निर्माण होते. जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. बहुतेक करून या लोकांच्या नोकरी व्यवसायात अडचणी दिसून येतात. धन लाभ होत नाहीत आर्थिक चिंता कायम सतावत असते.

४) अष्टम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ अकराव्या स्थानी (लाभ स्थानी), दुसर्या स्थानी ( धन स्थानी) आणि तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात प्रवासात चोरी, अपघात,चोरा पासून भय दिसून येते. तसेच सासुर वाडीशी वाद असल्या मुळे हे लोक बायकोस माहेरी पाठवत नाहीत. तसेच यात व्यक्ती स्वताच्या बेजबाबदार वागण्या मुळे सुखांना पारखा होतो आणि स्वताचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य कमी करतो. बहुतेक करून या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या कुंडलीत हा दोष जोडीदाराचे आकस्मित निधन दाखवतो. साधारण पणे अग्नी पासून जीवितास धोका दिसून येतो.

५) द्वादश स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ), सहाव्या स्थानावर ( रोग स्थानी ) आणि सप्तम स्थानी ( विवाह स्थानी) दृष्टी टाकतो. त्या मुळे विवाहा नंतर पाठीवरच्या भावंडाच्या बाबतीत अशुभ फळे मिळतात. पाठीवरच्या भावंडाचा अपघात किंवा त्यासम वाईट गोष्टी घडतात. शैय्या सुख स्थानी असलेला हा मंगळ लैंगिक सुखातून वादविवाद निर्माण करतो. विवाहा नंतर आजारपण किंवा अपघात संभवतो. या स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. बहुतेक करून या स्थानातील मंगळ हा व्यक्तीला कामांध किंवा कामपिपासू बनवतो व शरीर सुखा साठी व्यक्तीला पाप कर्मे करायला प्रवृत्त करतो. म्हणून या स्थानातील मंगळ व्यक्तीस कामांध पणामुळे स्वताच्या दुखास कारणीभूत होत्तो.

मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

१) मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
२) मंगळ कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे) असेल तर.
३) मंगळ उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
४) पत्रिकेत शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
५) पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.
६) मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही.

सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.


मंगळ दोषावर उपाय :-
१) गणेशाची उपासना करणे.
२) हनुमानाची उपासना करणे.
३) दुर्गा मातेची उपासना करणे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतावर सय्यम ठेवणे व त्या साठी रोज सकाळी १० मिनिटे व रात्री झोपताना १० मिनिटे या लोकांनी ध्यानाची सवय लावून घेतली पाहिजे.

मित्रानो या मंगळ दोषावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे परंतु हा लेख खूप मोठा झाल्याने आता लिखाण आवरते घेतो. तरी यातून आपणास बरीच माहिती मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया तसेच आपले या बाबतीतले अनुभव आपण मला कळवावेत व हि माहिती आपल्या मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती.

अधिक माहिती साठी संपर्क =   
bhagyalikhit.jyotish@gmail.com

!! ओम दत्त चिले ओम !!

आपला मित्र,
सचिन खुटवड