Saturday 14 April 2012

व्यक्तिमत्व आणि ज्योतिष :- विकृतपणा आणि विषण्णता


व्यक्तिमत्वातील एक दोष नैराश्य किंवा मानसिक अस्वस्थता यांचा ज्योतिष माध्यमातून शोध शक्य आहे का?
तर उत्तर आहे हा शोध घेणे सहज शक्य आहे..... या साठी प्रथम दोन भागात याचे विभाजन करावे लागेल. १) मानसिक विकृती २) मानसिक विषण्णता किंवा नैराश्य

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून पहिले असता व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता यांचा सरळ संबंध 'मून' म्हणजे चंद्राशी असतो.
या मध्ये आपण प्रथम विकृतीच्या लक्षणांचा विचार करू, मनुष्याच्या स्वभावात विकृती येण्यास जर पत्रिके मध्ये चंद्रा बरोबर मंगळ देखील बिघडला असेल तर हा दोष दिसून येतो.
विकृतीची लक्षणे =
१) बोलघेवडेपणा
२) अनिद्रा ( झोप न येणे)
३) चिडचिडेपणा किंवा मारहाण करणे
४) लैंगिकसुख घेताना यातना देणे किंवा घेणे
५) चुलबुलेपणा
६) सतत एकटक पाहत राहणे
७) अतिसाक्रियाशीलता
८) आक्रस्ताळेपणा
९) विचारात आणि वागण्यात चढउतार

आता विषण्णता म्हणजेच नैराश्याच्या लक्षणांचा विचार करू, मनुष्याच्या स्वभावात नैराश्य येण्यास चंद्रा बरोबर जर शनी देखील बिघडला असेल तर हा दोष निर्माण होतो या मध्ये शनी चन्द्र युती किंवा अन्य वाईट योग कारणीभूत ठरतात.
विषण्णताची लक्षणे =
१) एकलकोंडेपणा
२) नकारात्मक विचार येणे
३) लैंगिक इच्चा कमी होणे
४) आत्म्हत्तेचे विचार येणे
५) अपयशी पनाची भावना येणे
६) आळस येणे व अंधार करून सतत झोपून राहणे
७) कोणत्याही गोष्टीमध्ये सतत चुका काढणे
८) उदास होऊन सतत रडत किंवा कुढत बसने
९) स्वताहून कोणते कार्यात सहभागी न होणे

या शिवाय लहानसहान गोष्टींवरून चिडणे, थोड्या थोड्या वेळात मूड बदलणे, एखाद्या गोष्टीविषयी अतिप्रेम दाखविणे, अतिसंवेदनशील आणि पझेसिव्ह असणे, ह्या गोष्टी नॉर्मल दिसतात. पण हे आपल्यात असणारे व्यक्तिमत्व दोष ( म्हणजेच शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता ) असू शकतात. म्हणून जर अशी परिस्थिती सतत बनत असेल तर तुम्हाला तुमच्या पत्रिकेवर एक नजर मारणे गरजेचे आहे. आणि त्याच वेळी योग्य अशा मानस उपचार तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहता पत्रिके मध्ये कर्क राशी किंवा कर्क लग्न असेल तर व्यक्ती अतिसंवेदनशील किंवा जास्त गर्विष्ठ स्वभाव असू शकते. अशा परिस्थितीत चंद्र जर दुर्बळ असला तर शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता असू शकते. इतर राशींमध्ये चंद्र 3,6 किंवा 8 घरात असेल आणि दुर्बळ, जन्म कृष्ण पक्ष किंवा अमावास्यांच्या असेल तरी जातकात शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता संभव आहे. त्याच प्रमाणे चंद्रावर केतूचा प्रभाव असेल, किंवा चंद्र केतूसोबतच असतील किंवा चंद्राची युती शनी व केतूसोबत असेल किंवा एकट्या शनीबरोबर असल्यास व्यक्तीत शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता असण्याची शक्यता जास्त असते. तसेच चंद्रासोबत मुख्य ग्रहसुद्धा दुर्बळ असतील, गुरू दुर्बळ असून चवथे घरसुद्धा दुर्बळ असेल तर व्यक्ती नैराश्य आणि अशांतीची शिकार होते. यात जर मंगळ उग्र असेल तर ही शारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता आक्रमकतेत बदलू शकते. म्हणजे मारझोड करणे, हिंसक होणे, झटके येणे इत्यादी. वरील दोषांमध्ये व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाऊ शकते.

पत्रिकेत वर दिलेल्या लक्षणांपैकी एखादेही लक्षण दिसत असेल तर मुख्य ग्रह आणि चंद्राला प्रबळ करण्याचा प्रयत्न करावा. इष्टदेवाची आराधना करावी आणि ध्यान-प्राणायाम जरूर करावा. व त्याच बोरोबर योग्य अशा मानस उपचार तज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment