Saturday 14 April 2012

बहुपयोगी रुद्राक्ष


शिव पुराणात रुद्राक्षाच्या निर्मितीची कथा दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शंकरांने कठोर तपानंतर डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूचे काही थेंब खाली पडले. अश्रूच्या त्याच थेंबातून रुद्राक्ष नावाचा वृक्ष तयार झाला. त्यालाच रुद्राक्षाची निर्मिती म्हटली गेली आहे.

रुद्राक्ष (रुद्र+अक्ष) शंकराच्या डोळ्यांचे प्रतिरूप आहे. यामुळेच भगवान शिवाला रूद्राक्ष‍ प्रिय आहे. रुद्राक्षाचे दर्शन, स्पर्शाने अनेक पाप व दुष्कर्मांचा नाश होतो. रुद्राक्ष धारण केल्याने विविध प्रकारचे फायदे होतात. रुद्राक्षाचा प्रामुख्याने धार्मिक कार्यात वापर होतो. पण त्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत. यामुळेच हदयरोग आणि रक्तदाब निवारण्यासाठी रुद्राक्ष महत्वाचे भूमिका पार पाडतो.

मोठ्या संकटातून सुटका होण्यासाठी केला जाणारा महामृत्यूंजय जप रुद्राक्षापासून तयार होणार्‍या माळेवरच केला जातो. उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुध्दा त्याचा जप केला जातो. रुद्राक्ष एक अमोघ शक्ती असल्यामुळेच साधू-संताकडून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शंकराचे स्वरुप म्हणून रूद्राक्ष शुभ, पवित्र आणि कल्याणकारी मानला जातो.

रुद्राक्ष चवीने आंबट, रुचीवर्धक, वात, कफनाशक आहे. मधाबरोबर घासून त्याचे सेवन केल्यास मधुमेहापासून मुक्ती मिळण्यासाठी त्याची मदत होते. शिवपुराणात भूतबाधा आणि ग्रह पिडेपासून रुद्राक्षामुळे मुक्ती मिळत असल्याचे म्हटले आहे. रुद्राक्ष गळ्यात किंवा हातात बांधल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रुद्राक्षाच्या बियांवर पाच रेषा असतात. त्याला रुद्राक्षचे मुख म्हटले जाते.

सोमवार हा दिवस रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वांत श्रेष्ठ आहे. त्यासाठी शिवमंदिरात बसून मंत्र जप करावा. त्यानंतर शिवलिंगास स्पर्श करुन रुद्राक्ष धारण करावे. शिवपुराणात म्हटले आहे की जेथे रुद्राक्षाची पूजा-अर्चा विधिवत होते तेथे लक्ष्मीचा वास असतो. रुद्राक्ष पाण्यात तरंगत असेल तर तो कच्चा असतो. परंतु, पाण्यात बुडत असल्यास तो योग्य किंवा खरा समजला जातो.

रुद्राक्षाला एका दोर्‍यात बांधून गर्भवतीच्या पोटावर लटकविल्यास त्याच्या फिरण्याच्या गतीवरून गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे समजू शकते. एक मुखीपासून चौदा मुखीपर्यंतचे रुद्राक्ष धारण करण्यासाठी शिवपुराणात हे मंत्र आहेत.

(1) ॐ हीं नमः, (2) ॐ नमः, (3) ॐ क्लिंनमः, (4) ॐ हीं नमः, (5) ॐ ही नमः, (6) ॐ हीं हूं नमः, (7) ॐ हूं नमः, (8) ॐ हूं नमः, (9) ॐ हीं हूं नमः, (10) ॐ हीं नमः, (12) ॐ हीं हूं नमः, (12) ॐ क्रौं क्षौ रौ नमः, (13) ॐ हिं नमः व (14) ॐ नमः

अशा प्रकारे धार्मिक महत्त्वाबरोबर औषधी गुणांचा खजिना म्हणून रुद्राक्षाची ओळख आहे. त्याला श्रध्दा आणि विश्वासाने धारण करावे.
धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment