Saturday 14 April 2012

तुमचा भाग्यांक कोणता व्यवसाय किंवा करिअर दर्शवतो ?



तुम्ही तुमच्या करीयरच्या बाबतीत चिंतेत असाल तर आता करीयर काऊंसेलरकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या भाग्यंका नुसार तुम्ही करीयरची निवड करू शकता. ती कशी ते आता आपण पाहू......

भाग्यांक १ :
या भाग्यंकाचे लोकांना सतत नाविन्याची आवड असल्याने हे लोक एकाच नोकरी किंवा व्यवसायामध्ये फार काळ राहत नाहीत. सर्वसाधारण पणे ३ ते ४ वर्षांनी नोकरी किंवा व्यवसायामध्ये बदल करतात. खेळाडू,न्यायव्यवस्था, प्रशासन, परराष्ट्रीय वकील, वैद्यकिय, इलेक्ट्रॉनिक, संशोधन, एखाद्या विभागाचे प्रमुख किंवा म्यानेजर अशा क्षेत्रात रस घेणारे असू शकतात. या कामात जास्त धावपळ करावी लागत नाही. या नंबरच्या लोकांसाठी बौद्धिक काम करायला आवडते.

भाग्यांक २ :
या भाग्यंकाचे लोक सृजनशील असतात. तसेच उत्तम कल्पनाशक्तीचा विकास असल्यामुळे संगीताला चाली लावणे,प्रणय कादंबर्या लिहिणे,पेंटीग,नाट्यकृती, कविता यात यश मिळते. तसेच हे लोक केमिस्ट किंवा प्रयोग शाळेशी साम्भंधित असू शकतात. जल तथा वायूशी संबंधित काम, शिक्षणक्षेत्र, जाहिराती, चित्रपट या व्यवसायांशी त्यांचा संबंध येऊ शकतो. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात. तसेच दुध,द्रव पदार्थ , वनस्पती किंवा भाज्या या क्षेत्राशी सुद्धा यांचा संभंध येतो व या मध्ये हे लोक चांगले यश मिळवताना दिसून येतात.

भाग्यांक ३ :
ज्यांचा भाग्यांक 3 आहे अशा मंडळींचा सर्व सामान्यांचे व समाजाचे कल्याण करण्याकडे ओढा जास्त असतो त्यामुळे हे लोक समाजसेवा, राजकरारण, मंत्री, राजदूत, न्यायाधीश, सचिव, समुपदेशक, शिक्षक अशा कामात यशस्वी होतात. हॉटेल व्यवसाय, शिक्षण, तसेच वैद्यकीय क्षेत्रात हि हे लोक चमकू शकतात. समाजाला प्रबोधन करणे किंवा ज्ञान देणे किंवा समाजाचे भले करणे अशा कामात या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात.

भाग्यांक ४ :
या भाग्यंकाचे लोकांना वेगवान कामात रस असतो. सर्व तर्हेची मशिनरी, इलेक्ट्रिसिटी या कामात धावपळ यांना आवडते. त्याच प्रमाणे विमानाचे पायलट, इंजिनियरिंग, बांधकाम व्यवसायिक, कारखानदार तसेच शास्त्रज्ञ सुद्धा असू शकतात. ही मंडळी लॉटरी, केमिकल, धातूशी संबंधित कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच प्रमाणे गूढ विद्यांची आवड असल्याने ज्योतिष विषयात सुद्धा पारंगत असतात.

भाग्यांक ५ :
या भाग्यंकाचे लोकांमध्ये कोणत्याही व्यवसायात पडण्याची क्षमता असल्याने जो व्यवसाय कराल त्यात यश मिळेल. मुख्यत्वे व्यापार-व्यवसायात निपुण असतात. या लोकांसाठी शेयर बाजार,शिक्षण क्षेत्र, कॉमर्स, बँकिंग, अकाउंटशी संबंधित कामे यांच्यासाठी शुभ आणि फायदेशीर ठरतात. तसेच छोटे छोटे क्लासेस चालवणे किंवा बोलण्यात व वाद विवाद करण्यात प्राविण्य असल्याने सेल्समन किंवा वकिली क्षेत्रातही नाव कमावतात.

भाग्यांक ६ :
ज्या लोकांचा भाग्यांक ६ असतो ती मंडळी कला क्षेत्रात जास्त प्रगती करतात. सिनेमा, कला, फॅशन, टीव्ही शो, ग्लॅमर वर्ल्ड, पेंटिंग, सजावट, इत्यादी कामात ते निपुण असतात. या क्षेत्रात त्यांना यशही भरपूर मिळते. तसेच आर्किटेक, इंटिरियर डिझायनर, जवाहीर तज्ञ , संगीत तज्ञ, हॉटेल म्यानेजर किंवा मेवा मिठायीच्या व्यवसायात देखील खात्रीशीर यश मिळवतात. त्याच प्रमाणे जमीन जुमल्याचे व खरेदी-विक्रीचे दलाल, मोबदला घेऊन काम करणारे दलाल इत्यादी व्यवसायात सुद्धा यश मिळवतात.

भाग्यांक ७ :
ज्यांचा भाग्यांक ७ आहे अशा लोकांना परदेशा बद्दल फार आकर्षण असल्याने परदेशातील मालाची ने आण करण्याच्या व्यवसायात तसेच पर्यटन व्यवसायात या लोकांना खात्रीशीर यश मिळते. यांना नोकरीपेक्षा व्यापार जास्त फायदेशीर ठरतो. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, जहाजावर काम करणारे अशा ठिकाणी सुद्धा हे लोक नाव कमावतात. त्याच प्रमाणे वैद्यकीय व्यवसायात सुद्धा हे लोक चमकतात.

भाग्यांक ८ :
ज्यांचा भाग्यांक ८ अशा व्यक्ती पोलिस, सैन्यदल, सिक्युरिटी, टुरिझम, वकिल बनू शकतात. तसेच खाणी, लाकूड , लोखंड, जमीन, पाळीव प्राणी व स्टीलच्या व्यवसायातसुद्धा या लोकांना यश मिळू शकते. तसेच हे लोक उत्तम व्यवस्थापक व कंपनी सेक्रेटरी होऊ शकतात. तसेच जेथे सेवा नि कनिष्ट कामे करण्याची परिस्थिती असते अशा ठिकाणी हे लोक दिसून येतात. उ द. प्रिंटींग प्रेस परंतु या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात खूप कष्ट घ्यावे लागतात. या लोकांना कष्टाच्या प्रमाणात यश थोडे कमी व उशिरा मिळते.

भाग्यांक ९ :
या भाग्यंकाचे लोक प्रत्येक क्षेत्रात सापडतात जेथे धैर्य व आक्रमकता आहे अशा क्षेत्रात म्हणजेच पोलीस किंवा सैन्यात यांना यश चांगले मिळते व सैन्यात जबाबदारीच्या जागा हे लोक पटकावतात. तसेच हे लोक बोलण्यात माहिर असल्यामुळे नेता, सरकारी अधिकारी, पब्लिक रिलेशन ऑफिसर, रेडियो जॉकी बनू शकतात. तसेच हे लोक उत्तम डॉक्टर, केमिस्ट किंवा लोखंडाच्या साम्भंधित आपला स्वता:चा व्यवसाय सुरू करू शकतात. या लोकांमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे अवघड जाते.

जीवनात कुठल्या ही करियरची निवड करण्या अगोदर फक्त आपण आपली आवड नव्हे तर आपली योग्यता व आपला भाग्यांक या कडे सुद्धा तुम्ही लक्ष दिले तर करियर मध्ये यश मिळवणे नक्कीच सोपे होईल. वरील माहितीचा आपणास आपल्या जीवनात नक्कीच फायदा होईल !


तसेच या माहितीला अनुसरून करिअर मधील तुमचे अनुभव आपण मला कळवावेत. व माझ्या निरीक्षणातील अचूकता किती आहे यावर देखील आपण आपले मत द्यावे.

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

5 comments:

  1. khup chan mahiti ....Thanks

    ReplyDelete
  2. khupach chaan mahitee aahe

    pan.aapla bhangyank kasa olkhaycha?

    pls saanga

    ReplyDelete
    Replies
    1. सर्व प्रथम आपण भाग्यांक म्हणजे के ते समजुन घेऊ....

      समजा तुमची जन्म तारीख १/११/२०११ आहे. या जन्म तारखेत ही व्यक्ति १ या तारखेला जन्मलेली आहे. तेव्हा या व्यक्तीचा भाग्यांक १ आहे. समजा ही व्यक्ति १० किंवा १,१०,१९,२८ या तारखेला जन्माला आली असती, तर तिचा भाग्यांक एक आला असता. याचे कारण म्हणजे १ + ० = १ किंवा २ + ८ = १० आणि १+०=१.

      Delete
  3. खूप छान माहिती आहे ,

    माझा जन्म दिवस २५/११/१९८५ (वेळ - ०७:१५ AM स्थान - कोल्हापूर) आहे म्हणजे माझा भाग्यांक ७ आहे काय ?

    मला मेटल स्क्रैप संबधित व्यवसाय करायचा आहे मला या व्यवसाय मध्ये फायदा आहे कि नाही कृपया सांगा

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय मित्रानो,

      करिअर, संपत्ति (लक्ष्मी प्राप्ती) आणि प्रसिद्धि हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच जीवनभर धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिळते तर काहींना या गोष्टी मिळवताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न " भाग्यालिखित भविष्य " द्वारे केले जातात.
      आपणास करिअर या विषयाविषयी संपूर्ण प्रश्नांचे अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. आपणास आपली कुंडली पाहून त्यावर उपाय सुचवले जातील. उपायांचा कोणताही खर्च आपणास करावा लागणार नाही, उपाय मोफत मिळतील त्यासाठी आपण माला प्रत्यक्ष येउन भेटू शकता किंवा ऑन लाइन बोलू शकता आपणास आपली कुंडली ऑन लाइन प्राप्त होइल किंवा आपण मज्याशी फोन वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. सोबत माझे माहिती पत्रक जोडत आहे." भाग्यालिखित भविष्य एक दीपस्तंभ "

      करियर या विषयामध्ये आपल्या प्रत्येकाला साधारण पणे खालील प्रश्न कायम पडत असतात

      १) माझ्या नोकरी / व्यवसायाचे स्वरूप काय असेल ?

      २) माझ्या नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असेल ?

      ३) मला परदेशात जाण्याचा योग आहे का?

      ४) माझा भाग्योदय कोठे आहे ?

      ५) माझे शैक्षणिक योग काय आहेत ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )

      ६) माझे शैक्षणिक क्षेत्र कोणते असेल ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )

      ७) माझी मित्र संगत कशी असेल ?

      ८) माझ्या जीवनात भाग्योदयाचा काळ आहे का?असेल तर कोणत्या वर्षी भाग्योदय होईल ?

      ९) माझ्या जीवनात चढ उतार होणारा काळ आहे का ? असेल तर कोणत्या वर्षी चढ उतार जाणवतील ?

      १०) माझा शुभ अंक ( भाग्यांक ) कोणता?

      ११) माझा शुभ वार कोणता?

      १२) माझा शुभ रंग कोणता ?

      १३) कोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल?

      १४) माझ्या करिअर विषयक प्रगती साठी मी काय उपाय करावेत ?

      " भाग्यालिखित भविष्य " द्वारे वरील सर्व प्रश्नांची अचूक व प्रामाणिक मार्गदर्शनपर उत्तरे आपणास दिली जातील. तसेच या व्यतिरिक्त आपले करियर विषयक काही प्रश्न असल्यास ते आपण विचारू शकता. तसेच आपल्या नोकरी व्यवसायात यश मिळण्यास आपणास काही अडचणी असल्यास त्या दूर होऊन आपले करियर यशस्वी होऊन आपणास लक्ष्मी प्राप्ती साठी " भाग्यालिखित भविष्य " द्वारे अत्यंत सोपे, प्रभावी उपाय मोफत सुचवले जातील, कि जे उपाय केल्याने तुमचे भावी करियर उज्वल होण्यास मदत होइल ! योग्य मार्गदर्शनाचा एकवेळ आवश्य लाभ घ्यावा ! या करीता माला फ़क्त तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.

      मार्गदर्शनाची फी रुपये 500/- फ़क्त. आपण आपली फी नेट बँकिंग ने किंवा चेक ने भरू शकता. आपली फी माझ्या बैंक खात्यावर जमा झाली की माझ्या कडून तुम्हाला भेटीची वेळ ठरवून मिळेल. व त्या ठरलेल्या वेळी आपण मज्याशी फोन वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. तेव्हा तुम्हाला तुमचे विषया बाबतचे डीटेल्स मिळतील. सोबत माझे माहिती पत्रक पाठवत आहे.

      सोबत माझे बँक डीटेल्स देत आहे.

      Name - Sachin Khutwad,

      Banks - HDFC Bank, BHANDARKAR ROAD, Pune.

      Saving AC No - 00071050177150

      IFSC CODE - HDFC0000007


      सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

      फेसबुक - https://www.facebook.com/bhagyalikhita.ekadipastambha/info


      वेब साईट - www.bhagyalikhit.com
      ( विवाहाची अचूक तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन तसेच विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट ! एकदा अवश्य भेट द्या ! )

      ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

      ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

      धन्यवाद !

      आपला विश्वासु मित्र,
      सचिन खुटवड

      Delete