Sunday 20 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग दोन

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक  दोन

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक दोन

महिन्याच्या  २,११,२०,२९ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक २ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह चन्द्र असून तुमच्यात प्रगल्भ कल्पना शक्ति असते.
२) स्वाभाव स्वप्नालु असतो.
३) दुसर्याचे विचार व कल्पना प्रत्यक्षात आनन्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.
४) दुसर्याच्या भावनांचा विचारांचा नेहमी आदर त्यांची कदर करता.
५) उत्तम सहचरी व सहकारी म्हणून तुम्ही कायम गौरवले जाता.
६) स्वताच्या रम्य विचारत नेहमी दंग असून तुमच्यात व्यवहारिक दृष्टी कोणाची कमतरता दिसून येते.
७) बर्याच वेला स्वतहाच्या स्वप्नाच्या दुनियेत रमन्यात तुम्हाला आनंद वाटतो.
८) कही प्रमाणात भित्रा स्वभाव असून मवाल पनामुले दबावाला बलि पड़ता.
९) दूरचे प्रवास व समुद्रा विषयी खुप आकर्षण दिसून येते.
१०) इतर लोक तुमच्या चांगुल पनाचा फायदा घेतात त्या पासून सावध रहावे.
११) जे लोक तुम्हास प्रिय असतात त्यांच्या साठी तुम्ही कोणतेही दिव्य करायला तयार असता.
१२) तुमच्यात नम्रता असून आपल्या गुणांचे प्रदर्शन करने तुम्हाला आवडत नाही.
१३) तुम्ही तुमच्या भावना सहज सहजी दुसर्या समोर प्रकट करीत  नाही.
१४) लोकाना आकर्षित करण्याची शक्ति तुमच्यात आहे.
१५) घराबद्दल विलक्षण ओढा असून बारकाईने लक्ष देता.
१६) संसारात मात्र मतभेद असून संसार फरसा सुखाचा नसतो.
१७) प्रत्येक गोष्टीचा अतिरेक न केल्यास जीवन सुखी होण्यास मदत होइल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) आपुलकी                                                   १) थंड प्रकृति
२) सहचारीपना                                               २) मस्तर
३) खरेपना                                                     ३) घाईगर्दी 
४) कल्पनाविहार                                             ४) बुजरेपना 
५) भावनाप्रधान                                              ५) लहरिपना 
६) सोज्वळपना                                                ६) अंतर्मुख 

शुभ वार = सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग = पिवला, नीला, क्रीम.
मित्र अंक = २,४,६,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560
 

आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment