Monday 21 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग सात

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक सात 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक सात 

महिन्याच्या  ७,१६,२५ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ७ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह नेप्चून असून जन्मत:च अस्वस्थ असता.
२) तुमची वागणूक बर्याच वेळा गूढ़ असलेली दिसून येते.
३) तर्क शुद्ध विचार करून धेय पूर्ति होते.
४) सर्वसाधारण विचार सरनीच्या लोकां मधे मिसलने तुम्हाला आवडत नाही.
५) शांतता प्रिय असून शक्यतो कष्टाची कामे करने आवडत नाही.
६) भावना प्रधान असून मानाने कमकुवत आहात.
७) प्रकृतीची कुरकुर कायम चालू असते. मानसिक स्वास्थ्य बर्याचदा बिघडलेले दिसून येते.
८) विवाहिक जीवनात मात्र काहीतरी उणीव नक्कीच असते.
९) निर्णय पटकन घेतले जात नाहीत, त्यामुले बर्याचदा निराशेला तोंड द्यावे लगते.
१०) कोणत्याही एक विषयात प्रभुत्व नसते, एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिति असते.
११) प्रमाणिक, निष्ठावान व विश्वासु आहात.
१२) स्वभाव चंचल असल्याने काही वेळेस विसंगत स्वभावाचे दर्शन घडवता.
१३) प्रवासाची आवड असून परदेशाशी सम्बन्ध दिसून येतो.
१४) कोणत्याही विषयात सखोल जाण्याची तयारी नसल्याने धरसोड वृतिचे दर्शन होते.
१५) भावना प्रधान असून सहजासहजी कोणा पुढे भावना प्रकट करत नाही.
१६) वयाच्या ४२ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, परदेश व्यापारा पासून फायदा होतो.
१७) जीवनात भावनेच्या आहारी ना जाता भावनांवर ताबा ठेवल्यास जीवन सुखी होऊ शकते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) तपस्या                                                     १) खिन्नपना / नैराश्य  
२) शांतता                                                      २) आत्मविश्वासाचा आभाव  
३) चिंतन व मनन                                          ३) अस्वस्थपना 
४) सहनशीलता                                             ४) तर्हेवाइकपना  
५) प्रसन्नता                                                  ५) मानसिक रोगी


शुभ वार = रविवार, सोमवार,बुधवार,शुक्रवार.
शुभ रंग = पिवला,हिरवा.
मित्र अंक = १,३,४,५,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment