Saturday 19 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग एक

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग एक

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

सर्व प्रथम आपण भाग्यांक म्हणजे के ते समजुन घेऊ....

समजा तुमची जन्म तारीख १/११/२०११ आहे. या जन्म तारखेत ही व्यक्ति १ या तारखेला जन्मलेली आहे. तेव्हा या व्यक्तीचा भाग्यांक १ आहे. समजा ही व्यक्ति १० किंवा १,१०,१९,२८ या तारखेला जन्माला आली असती, तर तिचा भाग्यांक एक आला असता. याचे कारण म्हणजे १ + ० = १ किंवा २ + ८ = १० आणि १+०=१. 

भाग्यांक एक

महिन्याच्या १,१०,१९,२८ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक १ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह रवि असून स्वतंत्र विचार,उद्योग,स्फूर्ति,उत्साह,तल्लख बुद्धि व कले बद्दल प्रेम या गोष्टींचा बोध होतो.
२) स्वताचे निर्णय स्वतः घेण्या कड़े कल असतो.
३) आपल्या बुद्धि च्या व बोलण्याच्या  जोरावर दुसर्यावर छाप टाकण्यात प्रविण असतात.
४) सतत नवीन विचार नविन कल्पना डोक्यात घोलत असतात.त्या मुले एकाच ठिकाणी गुंतून राहत नाहीत.
५) दुसर्याला मार्गदर्शन करायला मनापासून आवडते.
६) प्रचंड धेयावादी असतात, त्यामुले हट्टी पना कड़े कल जातो.
७) दुसर्यांच्या आदेशा चे पालन करने तुम्हास जमत नाही.
८) स्वताच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याने अति कठिन प्रश्न देखिल सहज रितीने सोडवता.
९) जीवनात यश ४६ वर्षा नंतर प्राप्त होते.
१०) आई, वडिल, पत्नी, सासरे यांच्या कडून धन मिलते.
११) दुसर्याच्या इच्छेला न जुमानता कायदा हातात घेता.
१२) तुम्ही अति उत्साही असून सतत कार्य मग्न रहायला आवडते.
१३) प्रेम प्रकरणा मधे उतावले पना व घाई गर्दी होते, त्या मुले शेवट भांडणा मधे होतो.
१४) खेलाची खुप आवड असते.
१५) चकोरी बाहेर जावून दुसर्याला मदत करता.
१६) तुमच्या वागण्यात ठामपना व शुरपना असतो.
१७) व्यवसायात स्थिरता नसते, दर ३ ते ४ वर्षानी नोकरी बदलता.

महत्वाचे गुण - दोष

          गुण                                                                दोष
 १) उत्स्फूर्त पना                                                  १) हट्टी पना
२) अधिकार                                                       २) आक्रामक वृत्ति
३) आत्मविश्वास                                                  ३) वरचढ़ पना 
४) निश्चयी पना                                                   ४) आहंकार
५) संशोधक वृत्ति                                                 ५) खोटा दिमाख
६) हरहुन्नरी पना                                                ६) खर्चिक पना

शुभ वार = रविवार, सोमवार, गुरुवार.
शुभ रंग = सोनेरी, पिवला, नारंगी.
मित्र अंक = १,३,४,५,७,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560


आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment