Monday 21 July 2014

कुंडली क्रमांक -  १२  विवाह विषयक


॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १२ ( विवाह योग ) ( वय ३६ वर्षे पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ३०९ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ३/०१/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय ३६ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता.

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०३/०४/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

या वर तो हसून म्हणाला " तुम्ही दिलेली तारीख ०३/०४/२०१४ आहे परंतु मी जरउपासना केल्या नाहीत तर माझा विवाह होणार नाही का ? " मला त्याच्या बोलण्यातला खोचक पणा कळत होता,

मी देखील हसतच त्याला उत्तर दिले - " उपाय न करता विवाह होणे अवघड आहे. भाग्यात विवाह सुख नाही . उपासना केल्या नाहीत तर दिलेली तारीख ओलांडून जाईल व विवाह होणार नाही " असे मी त्याला म्हणालो …. त्याची खट्याळ नजर मला चिडवण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु मी शांत होतो.

आणि ०३/०४/२०१४ या दिवशी तो मला ऑफिस मध्ये भेटायला आला. " सर विवाह अजून झाला नाही." मी माझ्या बोलण्यावर ठाम होतो उपासनेचे महत्व त्याला परत पटवून दिले आणि उपासना करा विवाह होऊन जाईल असे सांगितले. त्याने ते मान्य केले नि त्या दिवसा पासून उपासना करू लागला आणि आज सकाळीच त्याच्याशी माझे बोलणे झाले. खुश होऊन तो मला सांगत होता " सर या महिन्यात म्हणजेच १७/०६/२०१४ ला माझा विवाह सोहळा पार पडला " मी सुद्धा त्याला सुखी विवाह जीवनासाठी शुभेछा दिल्या !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

No comments:

Post a Comment