Sunday 20 July 2014

कुंडली क्रमांक -  ८  मृत्यू योग

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ८ ( मृत्यू योग ) 
नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २८४ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०८/१२/२०१२ रोजी करीअर विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी पत्नीला बरोबर घेऊन आला होता . त्या वेळी त्याचे वय २६ वर्षे पूर्ण होते. याला आर्थिक अडचणींनी घेरले होते असे तो सांगत होता. 

त्याचे सर्व बोलणे मी शांतपणे ऐकून घेतले व त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास केल्यावर मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली म्हणजे त्याचा मृत्यू ! मी त्याला एका वाक्यात सांगितले कि बाबा तुझ्या करिअर पेक्षा तुला तुझ्या जीवाला जपावे लगेल. मी त्याला सांगितले २८ वर्ष पूर्ण होण्याच्या आत किंवा २/११/२०१४ या तारखेच्या आत तुला वाहन व पाणी या पासून धोका आहे. मी काही उपाय लिहून देतो ते तू केलेस व यातून वाचलास तर परत ये मी तुझे करिअर चे लिहून देतो ! त्याच्या जीवितावरील संकट टाळण्यासाठी मी त्याला काही उपासना लिहून दिल्या व दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी त्यला मदत होईल व जीविताचे रक्षण होईल असे लिहून दिले ! 

तसे तो काहीसा चिडला. काहीसा रागाऊनच त्याने विचारले - असे कसे शक्य आहे ? बायको कडे रागाने पाहत तो म्हणाला - " या असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तू म्हणालीस म्हणून मी इथपर्यंत आलो. आता झाले का तुझे समाधान ! मला काही होणार नाही नि मी असले उपाय पण करणार नाही असे म्हणत तो रागाने उठला ! मी शांत होतो परंतु जाताना मी त्याच्या बायकोला परिस्थितीचे गांभीर्य व उपायांचे महत्व समजून सांगितले. 

आणि १५/०७/२०१३ या दिवशी संध्याकाळी त्याच्या बायकोचा मला ऑफिस मध्ये फोन आला ! फोन वर ती रडत होती. विचारल्यावर तिने मला सांगितले कि - " आज सकाळी माझ्या नवर्याचा अपघात झाला. मी अपघाताचे स्वरूप विचारले - तिने सांगितले त्याने मी सुद्धा थक्क झालो ! हे महाशय इंडिका गाडी चालवत असताना केनोल मध्ये पडले व केनोल ला फुल पाणी असल्याने यांची गाडी केनोल च्या तळाला अडकून पडली. लोकांनी पहिले असता याला पाण्याच्या बाहेर काढले तर हा बेशुद्ध अवस्थेत होता. दवाखान्यात दाखल केल्यावर डॉक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी आहे असे सांगितले. परंतु ४ तासा नंतर पतीला शुद्ध आली व आता त्यांच्या वरचा धोका टाळून गेला आहे असे ती रडत रडत बोलत होती. तुम्ही दिलेले उपाय मी रोज करीत असल्यानेच ते यातून वाचले असे तिचे म्हणणे होते. नि आता पती पूर्ण शुद्धीवर आलाय नि तुम्हाला भेटायचे म्हणतोय असे तिने सांगितले ! 

मी तिला तेवढ्याच शांतपणे उत्तर दिले कि ज्यांचा माझ्या शास्त्रावर विश्वास नाही अशा व्यक्तींना माझी दारे बंद आहेत. तू दिलेले उपाय जीवनभर कर व तुझ्या पतीलाही करायला सांग , तुमचे चांगले होईल ! एवढे बोलून मी शांतपणे फोन कट केला ! 

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.


आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७







No comments:

Post a Comment