Tuesday 26 June 2012

प्रिय मित्रांनो ,

हिंदू विवाह प्रकार विषयी आज आपण माहिती घेणार आहोत !

विवाह हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणारा एक सुंदर प्रसंग. विवाह संस्कार ह्याचा मूळ उद्देशच वंश वृद्धी हा आहे. किंबहुना वंश वृद्धी होण्यासाठीच विवाह संस्कार केला जातो. या लेखात मी तुम्हाला विवाहाचे धर्मशास्त्राने सांगितलेल्या विविध प्रकारांची माहिती देण्याचा एक प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. आपणा सर्वांस हा लेख आवडेल असा विश्वास मला आहे. तरी लेख वाचल्यावर आपल्या प्रतिक्रया जरूर कळवाव्यात.

हिंदू विवाहाचे एकूण ८ प्रकार पडतात, ते असे -

१) ब्रम्हा विवाह २) दैव विवाह ३) आर्ष विवाह ४) प्रजापती विवाह ५) गंधर्व विवाह ६) असुर विवाह ७) राक्षस विवाह ८) पिशाच्च विवाह आता या प्रत्येक प्रकारची आपण माहिती जाणून घेऊ यात.

१) ब्रम्हा विवाह -

या विवाह प्रकारात मुलगा आपले ब्रम्हाचर्या व्रताचे पालन करून जेव्हा त्याचे व्यावहारिक शिक्षण ( आजच्या काळात कॉलेज ) पूर्ण करतो तेव्हा तो विवाहास पात्र ठरतो. मुलाचे आईवडील आपल्या मुला साठी सुयोग्य चारित्र्यवान मुलगी वधु म्हणून शोधतात. मुलाचे आईवडील स्ववर्ण,स्वजातीय व सुस्वरूप चारित्र्यवान मुलीच्या आई वडिलांकडे त्या मुलीचा हात आपल्या मुलासाठी मागतात. मुलीचे पालक देखील आपल्या मुलीसाठी त्या मुलाचे गुण, शारीरिक क्षमता व चारित्र्य पाहूनच वर म्हणून निवड करतात. ब्रम्हा विवाह हा पूर्ण पणे ठरवून ( अरेंज म्यारेज ) मुलाची आणि मुलीची एकमेकांना पसंती आहे हे पाहूनच केला जातो. या विवाहात कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता वधूचा फक्त काही कपडे व काही अलंकार घेऊन स्वीकार केला जातो. धर्म शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या ब्रम्हा विवाहाला सर्वात वरचे स्थान किंवा दर्जा दिला गेला आहे.

२) दैव विवाह -

या विवाह प्रकारात वयात आलेल्या तसेच दागिन्यांनी सजलेल्या मुली साठी तिच्या आईवडिलांना जेंव्हा योग्य व सुस्वरूप वर शोधूनही सापडत नाही तेव्हा, तिचे श्रीमंत आईवडील आपल्या मुलीसाठी दूरगावी असलेला तसेच परिस्थितीने गरीब असलेला मुलगा शोधून त्याच्या बरोबर त्याच्या संमतीने आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. या विवाहात मुलाचे गोत्र, जात काही पहिले जात नाही. असा हा मुलगा वधूच्या घरी घर जावई म्हणून राहू लागतो. या विवाहाला धर्मशास्त्रात खालचा दर्जा दिला गेला आहे.

३) आर्ष विवाह -

या विवाह प्रकारात श्रीमंत घरचा मुलगा परिस्थितीने गरीब असलेल्या मुलीच्या आई वडिलांना धन देऊन त्यांच्या सुंदर मुलीशी विवाह करतो. मुलीच्या घरची परिस्थिती गरीब असून तिचे आई वडील तिच्या विवाहाचा खर्च करण्यास असमर्थ असतात. अशा वेळी मुलीचे आई वडील मुलीपेक्षा वयाने मोठ्या व रंग रूपाने मुलीस अयोग्य अशा श्रीमंत मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. या विवाहात मुलगा वधूच्या आई वडिलांना मुलीच्या बदल्यात भेट म्हणून जमीन, धन किंवा त्यासम भेट वस्तू देतो. हा विवाह मुलीला तिच्या मनाविरुद्ध मान्य करावा लागतो. येथे तिच्या भावनांचा विचार केला जात नाही. मनाविरुद्ध आणि फक्त परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मुलगी हा विवाह मान्य करते. म्हणून धर्म शास्त्रात या विवाह आदर्श मानला गेला नाही.

४) प्रजापती विवाह -

या विवाह प्रकारात मुलीचे आईवडील आपल्या मुलीसाठी असा योग्य असा वर शोधतात कि, जो तिचे पालन, पोषण व संरक्षण योग्य पद्धतीने करू शकेल. व जेथे आपली मुलगी सुखी राहील अशा मुलाच्या हातातच आपल्या मुलीचा हात ते देतात. अशा मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लाऊन देतात. येथे मुलाची व मुलाची दोघांच्या संमतीने विवाह ठरवला जातो. या विवाह पद्धती मध्ये विवाह काही काळ आधी ठरवला जातो आणि नंतर काही कालावधीने वाजत गाजत विवाह सोहळा पार पडला जातो. या विवाहास आदर्श विवाह मानले गेले आहे.


५) गंधर्व विवाह -

या विवाहात आईवडिलांची तसेच समाजाची संमती नसताना वर व वधू हे दोघे एकमेकांच्या संमतीने गुपचूप पळून जाऊन विवाह करतात. या विवाहाची माहिती दोघांच्या कुटुबियांना नसते. येथे दोघांच्या कुटुंबियांचा या विवाहाला विरोध असतो. येथे गोत्र किंवा कुळाचा विचार केला जात नाही. फक्त वधू आणि वर आपल्या आवडीचा विचार करतात. व एखाद्या मंदिरात / चर्चमध्ये / रजिस्टर विवाह करतात. या विवाह प्रकारात वधू आणि वराचे विवाह होण्या पूर्वी वासने पोटी शरीर संबंध आलेले असतात. यालाच गंधर्व विवाह म्हटले जाते आजच्या युगात याला प्रेम विवाह म्हटले जाते. केवळ आकर्षण व शारीरिक वासने पोटी हा विवाह केला जातो म्हणून याला धर्म शास्त्रात सर्वात खालचा दर्जा गेला आहे.

६) असुर विवाह -

या विवाह प्रकारात वर हा कोणत्याही प्रकारे वधूच्या योग्यतेचा नसतो. तो कोणत्याही दृष्टीने वधू पेक्षा गुणांनी व रूपाने सरस नसतो. परंतु फक्त प्रचंड संपत्तीच्या जोरावर हा मुलगा देखण्या मुलीशी विवाह करतो. येथे मुलाच्या शिक्षणाचा योग्यतेचा विचार केला जात नाही. मुलीचे आई वडील या मुलाच्या कर्जाच्या किंवा उपकाराच्या ओझ्या खाली दाबले असल्याने हा मुलगा त्यांची पिळवणूक करतो व कर्जाच्या व्याजा पोटी त्यांची सुंदर मुलगी हस्तगत करतो व तिच्याशी विवाह करतो. येथे मुलीचे आई वडील मुलाच्या दहशतीला घाबरून आपली सुंदर मुलगी त्याच्या दावणीला बांधतात. व आपली कर्जातून मुक्तता करून घेतात. म्हणून या विवाहास शास्त्राने खालचा दर्जा दिला आहे.


७) राक्षस विवाह -

राक्षस विवाहामध्ये , वर ( नवरदेव ) वधूच्या कुटुंबियांना लढाईत हरवतो , त्यांना वरचढ होतो व वधूस जबरदस्तीने विवाह करण्यास भाग पडतो . हा विवाहाचा योग्य प्रकार मनाला जात नाही , कारण या प्रकारात वर लग्नासाठी वधू वर जोर- जबरदस्ती करतो. येथे विधूस जबरदस्तीने हस्तगत केले जाते. युद्धात अनेकांचे बळी पडले जातात. म्हणून या विवाहास शास्त्राने मान्यता नाकारली आहे.

८) पिशाच्च विवाह -

पिशाच्च विवाह हा आठवा व हिंदू विवाह पद्धतीमधील शेवटचा प्रकार आहे . ह्या विवाह प्रकाराला सर्वात खालच्या दर्जाचे मानले गेले आहे , कारण या प्रकारात जरी वधू तिच्या साठी निवडण्यात आलेल्या वरासोबत विवाहास तयार नसली तरीही वधूच्या इछेचा विचार केला जात नाही . खरेतर , तिला या विवाहासाठी जबरदस्ती केली जाते . या विवाहात वधूचे कुटुंब भेटवस्तू किवा पैसे हि देत नाही . अक्षरशः वधूला तिच्या इच्चे विरुद्ध वागण्यास भाग पडले जाते . या प्रकारात पुरूष बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वधू बरोबर शरीर संबंध ठेवतो किवा अमली पदार्थ पाजून स्त्रीशी जवळीक साधतो व मग तिला लग्नासाठी भाग पडतो. वधू बरोबर संभोग करताना हा वर पशु समान वर्तन करतो तिला पिडा देतो. यात संभोगा वेळी स्त्रीला शारीरिक वेदना व पिडा देऊन हा वर स्वताचे समाधान करून घेतो म्हणून या विवाह प्रकारास शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/


धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment