Wednesday 20 June 2012

गुरुपुष्यामृत गजांत लक्ष्मी विशेष -

मित्रांनो ,
                      गुरु पुष्यामृत या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे हे आपणास माहीतच आहे. सोन्याला आपण संपत्तीचे खरे रूप मानतो, या मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने संपत्ती मध्ये वाढ होत जाते हा अनुभव आहे. तसेच हि संपत्ती आपल्या घरात स्थिर राहून त्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी हे आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि हि लक्ष्मी आपल्या वास्तूत स्थिर राहावी म्हणून " गजांत लक्ष्मी " चा उपयोग केला जातो. ज्याच्या दारी हत्ती झुलतात, तेथे सर्व सुख नांदते, असेच आपले शास्त्र मानते. आज हि केरळ मध्ये यश,कीर्ती व वैभव वाढावे महणून घरासमोर हत्तीची जोडी पाळण्याची परंपरा आहे. तसेच घरातही गजांत लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. गजांत लक्ष्मी मुळे वास्तुदोषाचे निवारण होते. घरात सुख संपत्ती येते व ती टिकून राहते. वैभव व यश कीर्ती वाढते.

या विषयीची आख्यायिका अशी -
                                महाभारत काळात जेव्हा दुर्योधनाने पांडवांचे राज्य हडप केले नि त्यांना वनवासाला पाठवले तेव्हा हे राज्य परत कसे मिळवायचे या साठी भीमाने कृष्णाला विचारले तेव्हा कृष्णाने भीमाला सांगितले कि " जो व्यक्ती गजांत लक्ष्मीची स्थापना आपल्या घरात करतो त्याच्या घरी कायम संपत्ती टिकून राहते. तू या गजांत लक्ष्मीला तुझ्या घरी स्थापन कर. तुझे गेलेले राज्य तुला परत मिळेल व ते टिकून राहील ." या वर भीमाने विचारले - " गजांत लक्ष्मी मला कोठे मिळेल. " कृष्ण उत्तरला - " इंद्राचा जो ऐरावत हत्ती आहे तोच मुळात गजांत लक्ष्मी आहे तू त्याला आपल्या दारी आण म्हणजे तुला तुझे राज्य परत मिळेल नि ते टिकून हि राहील ." हे ऐकून भीम इंद्र राजाकडे गेला. त्याने त्याला ऐरावताची मागणी केली. इंद्राने भीमाला एक अट घातली तू जर या ऐरावातला उचलू शकलास तर तू याला घेऊन जाऊ शकतोस. हे ऐकून भीमाने ऐरावत हत्तीला संपूर्ण शक्ती पणाला लाऊन उचलून घेतले नि स्वताच्या दारी आणले. नि काही दिवसातच पांडवाना त्यांचे राज्य युद्धातून परत मिळाले आणि ते टिकून हि राहिले.

गजांत लक्ष्मीची मूर्ती कशी असावी ?
                           गजांत लक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती. सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्ण अशी ती असावी, तिचा उजवा पाय पुढे म्हणजेच प्रगतीचे लक्षण, सोंड आत वळलेली म्हणजेच संपत्ती राखणारी, सुवर्णाने वर्खांकित असलेली अशी हि मूर्ती असावी. गंडस्थळावर गोमुख असावे, कमलपुष्प , गणेश , हरीण आणि मोराच्या प्रतिमा या लक्ष्मीवर कोरलेल्या असाव्यात. अशा प्रकारे सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्ण असलेल्या गजांत लक्ष्मीला उत्तर दिशाभिमुख ठेवल्याने धन,कीर्ती, यश या मध्ये उतोरात्तर वाढ होत जाते असे शास्त्रात सांगितले आहे.

आपण हि या गजांत लक्ष्मीची मूर्ती गुरुपुष्यामृत या शुभ मुहूर्तावर घरात किंवा ऑफिस मध्ये स्थापन करून सुख-समृद्धी, धन , यश , कीर्ती मिळवून ती टिकवून ठेऊ शकता. 

गुरुपुष्यामृत मुहूर्त = २१ रात्री २२/६/२०१० रोजी पहाटे ४ : १६  पासून ६ :०४  वाजे पर्यंत.

मित्रांनो हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/


धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment