Sunday, 20 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग पाच

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक पाच  

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक पाच 

महिन्याच्या  ५,१४,२३ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ५ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह बुध असून तुम्ही व्यापारी वृत्तीचे व जलद रितीने काम करणारे आहात.
२) हुशार,तल्लख,शास्त्राची आवड असणारे आहात.
३) दुसर्याला न दुखावण्याचा स्वाभाव असून सहकार्य देन्याकडे कल असतो.
४) स्त्रियाँ मधे सुखी वैवाहिक जीवन दिसून येते,परन्तु मुले होण्या बाबत व प्रसूति बाबत त्रास दिसून येतो.
५) लहान वयात एखादे प्रेम प्रकरण होण्याचा संभव असतो व त्यातून नुकसान होते.
६) बर्याच वेला जुगार किंवा कोड़े सोडवन्याचा नाद दिसून येतो.
७) विरोधी लिंगी व्यक्ति मधे तुम्ही लोकप्रिय असता.
८) तुमच्या जवळ चांगले शब्द भंडार असते त्यामुले बोलण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही.
९) तुम्ही ममतालु व स्वातंत्र्य प्रिय आहात.
१०) स्वताच्या व्यवसायात यश मिलते. शिकवणी घेणे किंवा क्लास्सेस घेणे यात यश दिसून येते.
११) नोकरी मधे बैंक किंवा कॉमर्स क्षेत्रात यश दाखवते.
१२) पैशाच्या बाबतीत नशीबवान असता.
१३) काही तरी त्वचा विकार नक्कीच असतो.
१४) तुम्हाला जीवनात प्रवास व सतत काही तरी नाविन्य याची आवड असते.
१५) नोकरीत छोट्या पदावर नोकरीला लागुन शेवट मोठ्या अधिकार्याच्या जागेने होतो.
१६) जीवनात ३२  वर्षा नंतर उत्कर्ष होतो.
१७) प्रेमात योग्य दक्षता न घेतल्यास त्यातून अनौरस संतातिची शक्यता दिसून येते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                     दोष

१) सहकार्य                                                      १) चिकाटीचा अभाव 
२) व्यवहार दक्षता                                           २) संशयी वृत्ति  
३) जागरूकता                                                 ३) चंचलता  
४) धूर्त पना                                                    ४) बिनभरवशाचा  
५) सदाचार                                                    ५) वाहत जाणारा 


शुभ वार = बुधवार, शुक्रवार,शनिवार.
शुभ रंग =  हिरवा. (लाल रंग शक्यतो वापरू नए)
मित्र अंक = १,३,४,५,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment